Monday, May 6, 2024
Homeदेशनोकरीची सुवर्णसंधी! दहावी उत्तीर्णांना ६९ हजारांपर्यंत पगार!

नोकरीची सुवर्णसंधी! दहावी उत्तीर्णांना ६९ हजारांपर्यंत पगार!

सीमा सुरक्षा दलात १०,४९७ जागांची भरती

मुंबई : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या एकूण २४ हजार ३६९ रिक्त जागा आहेत. या अंतर्गत सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १० हजार ४९७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे.

या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य ज्ञान आणि जागरुकता, प्राथमिक गणित आणि इंग्रजी/हिंदी या विषयातील ८० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि एकूण १६० गुण असतील. परीक्षेसाठी एकूण ६० मिनिटांचा म्हणजेच एक तासाचा कालावधी दिला जाईल. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये असेल.

अधिक संपूर्ण माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा….

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

अटी व नियम

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (GD)

पदसंख्या – २४ हजार ३६९ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी पास

वयोमर्यादा – १८ ते २३ वर्ष

अर्ज शुल्क – १०० रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू करण्याची तारीख – २७ ऑक्टोबर २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२२

संगणक आधारित परीक्षेची तारीख – जानेवारी २०२३

एकूण पदे – २४ हजार ३६९

सीमा सुरक्षा दल ( बीएसएफ) – १० हजार ४९७ पदे
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल – १०० पदे
केंद्रीय राखीव पोलीस दल – ८ हजार ९११ पदे
सशस्त्र सीमा बल – १ हजार २८४ पदे
इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस – १ हजार ६१३
आसाम रायफल्स – १ हजार ६९७
सचिवालय सुरक्षा दल – १०३ पदे
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो – १६४ पदे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -