Tuesday, May 7, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सIncome Tax : आयकर खात्याच्या नावावर २१ लाखांना गंडा

Income Tax : आयकर खात्याच्या नावावर २१ लाखांना गंडा

  • गोलमाल : महेश पांचाळ

‘आपल्या विविध बँक खात्यांपैकी नागपूर येथील बँक खात्यावर आयकर खाते लक्ष ठेवून आहे. सावध राहा,’ असा मोबाइलवरून एका अनोळखी व्यक्तीकडून एका व्यापाऱ्याला कॉल आला होता. सुरुवातीला व्यापाऱ्याने गांभीर्याने घेतले नव्हते; परंतु चार ते पाच दिवस सतर्कतेबाबत केलेल्या फोनमुळे या व्यापाऱ्यालाही आपल्या खात्यामध्ये काही गडबड तर नाही ना? याबाबत मनात भीती निर्माण झाली. त्यामुळे फोन करणारी व्यक्ती आणि व्यापारी यांच्यामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण झाले. आपली कोणीतरी काळजी घेत असल्याचे व्पापाऱ्याला वाटू लागले होते. या व्यापाऱ्याला आयटी विभाग लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे आणि वेळप्रसंगी अटकेची कारवाई होऊ शकते असा धमकीवजा इशारा त्या अनोळखी व्यक्तीने दिला आला. अटक टाळण्यासाठी आपल्याला तडजोड करावी लागेल, असे सांगत त्या व्यक्तीने व्यापाऱ्यांकडे पैशांची मागणी सुरू झाली. भीतीपोटी, या व्यापाऱ्याने त्याला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २१ लाख रुपये भरले,” शिवाय, व्यापाऱ्याच्या नावाने अवैध पार्सल कॅनडाला पाठवले जात असल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे व्यापारी घाबरला होता. मात्र, आपली फसवणूक झाली असल्याचे या व्यापाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर या व्यापारी व्यक्तीने या घटनेची माहिती नवी मुंबई पोलिसांना दिली. “या वर्षीच्या ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला होता. सायबर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह भारतीय दंड संहिता कलम ४२०(फसवणूक) आणि ३४(सामान्य हेतू)अंतर्गत फसवणूक करणाऱ्या अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पीडितेच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी, पोलिसांनी व्यवहारात गुंतलेली सर्व बँक खाती तातडीने गोठवली, ज्यात त्यावेळी एकत्रितपणे १८ लाख ८० हजार ३१७ रुपये होते. तांत्रिक मार्गदर्शनाचा उपयोग करून, पोलिसांनी यशस्वीरीत्या गुन्हेगाराचा चेन्नई येथे शोध लावला आणि चेन्नईतल्या अन्नानूर येथून लोकेशकुमार नावाच्या आरोपीला ९ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. पोलिसांनी तांत्रिक माहितीवर काम केले. या रॅकेटमध्ये आणखी काही लोक सामील असण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे काम सायबर पोलिसांकडून केले जात आहे. पोलिसांच्या समयसूचकेमुळे संबंधित आरोपीचे बँक खाते गोठवल्यामुळे, व्यापाऱ्याचे नुकसान वाचले आहे. त्याला ते पैसे परत मिळू शकतात; परंतु या गुन्ह्याचा मास्टर माईड कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

सायबर गुन्हे टाळण्यासाठी घ्या काळजी :

  • अनोळखी व्यक्तीने केलेल्या फोनमुळे घाबरून जाऊ नका.
  • संबंधित बँकेबाबत तक्रारीचा जर फोन आला असेल तर बँकमध्ये जाऊन खातरजमा करा.
  • पार्सलच्या नावाने अनेकांना फोन येतात, कोणतीही रक्कम ट्रान्फर करण्याअगोदर पार्सल नक्की कोणाचे आहे याची माहिती घ्या.

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -