Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरअवकाळीमुळे रब्बी पिकांना धोका

अवकाळीमुळे रब्बी पिकांना धोका

पालघर (प्रतिनिधी) :पालघर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात चांगलाच बदल झाला आहे.

पालघर जिल्ह्यात वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात हरभरा, मूग, वाल, तीळ व अन्य रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. पण यंदा जिल्ह्याचे ऋतूचक्र बदलल्यामुळे शेतकरी रब्बी पिके घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. अवकाळी पावसामुळे यंदा खरीप पिकाचेही अतोनात नुकसान झाले. तो अनुभव गाठीशी असल्यामुळे शेतकरी रब्बी पिकांची लागवड करण्यास मागे पुढे करत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वाल, हरभरा, तीळ व मूग इ. कृषी उत्पादने घेतली जातात. पण ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

रब्बी पिकावरही संक्रांत – शांताराम भोईर, वाडा

यंदा निसर्गाने पाठशिवणीचा खेळ चालवला आहे. अवकाळी पावसाने खरिपाच्या हंगामात धुमाकूळ घातला, आता पावसाळी वातावरणामुळे रब्बी पिकावरही संक्रांत आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी पार खचून गेले आहेत.

सध्याच्या वातावरणामुळे लागवड थांबवली- आत्माराम दुमाडा, विक्रमगड

दरवर्षी तीळ व हरभऱ्याच्या पिकाची लागवड करतो. पण सध्या असलेले वातावरण लक्षात घेऊन तूर्तास थांबलो आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -