Saturday, May 18, 2024
Homeक्राईमIllegal Money : निवडणुकीदरम्यान राज्यात पैशांचा पाऊस! बीड येथे कारमध्ये सापडले तब्बल...

Illegal Money : निवडणुकीदरम्यान राज्यात पैशांचा पाऊस! बीड येथे कारमध्ये सापडले तब्बल एक कोटी

तर दुसरीकडे बीकेसीमध्ये सापडला बनावट नोटा तयार करणारा कारखाना

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्याने निवडणूक आयोग (Election Commission) राजकीय नेते व राजकीय पक्षांच्या प्रत्येक हालचालीवर व वक्तव्यावर बारीक नजर ठेवून आहे. आचारसंहितेचा भंग होत नसल्याची दखल आयोगाकडून घेतली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर कायम आहे. मात्र, तरीही द र निवडणुकीप्रमाणे यावेळेसही मोठ्या प्रमाणात अवैध रक्कम आढळून आली आहे. काही दिवसांपूर्वी दादर परिसरात एका कारमध्ये १ लाख ८० हजारांची रोकड आढळली होती. यानंतर आता बीडमध्ये इनोव्हामध्ये तब्बल एक कोटींची रोकड सापडली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बीडमधील गेवराई तालुक्यातील खामगावमध्ये असलेल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्टवर इनोव्हामध्ये काल रात्री तब्बल एक कोटी कॅश सापडली. ही दहा लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम असल्याने ही रक्कम कोषागार कार्यालयाकडे सुपूर्त केली जाणार आहे. आयकर विभागाचे अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून ही रक्कम काढली गेली होती की नाही याची माहिती घेणार आहेत. संभाजीनगरमधील द्वारकादास मंत्री बँकेच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यावेळी या पैशासोबत संभाजीनगर येथून पैसे बाळगण्याचे परवानगी पत्र होते असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बीकेसीमध्ये सापडला बनावट नोटा तयार करणारा कारखाना

दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी काल रात्री बीकेसी परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. या कारखान्यात पाच, दहा, शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी नौशाद शाह आणि अली सय्यद या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांच्या बनावट नोटा, तसेच ८० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

मेहेंदी आणि नौशाद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आरोपींनी यूट्यूबवरून बनावट नोटा बनवण्याची प्रक्रिया शिकून घेतल्याचे पोलिसांना समजले. ते १० हजार रुपयांच्या बनावट नोटा ५ हजार रुपयांना विकत होते. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -