Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत दिवसभरात ८,०८२ नवे बाधित

मुंबईत दिवसभरात ८,०८२ नवे बाधित

२ कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबई  : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून आज दिवसभरात ८,०८२ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८०,७६,०२ वर पोहोचली आहे.

सोमवारी २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १६,३७९ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात ६२२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७,५१,३५८ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. दरम्यान,

सोमवारी आढळलेल्या रुग्णांपैकी ५७४ कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ५७४ पैकी ७१ रुग्णांना ऑक्सिजन बेड्सवर ठेवण्यात आले आहे, तर सील बंद इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सील बंद इमारतींची संख्या ३१८ झाली आहे.

 

माहीममध्ये १३०, धारावीत ४१ तर दादरमध्ये ९१ रुग्ण

 

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून तिसऱ्या लाटेत धारावी, दादर, माहीममध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेतही धारावी, दादर, माहीममध्ये रुग्णसंख्या वाढली होती. सोमवारी दिवसभरात माहीममध्ये सर्वाधिक म्हणजे १३० तर दादरमध्ये ९१ आणि धारावीमध्ये ४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र एवढी मोठी रुग्णसंख्या आढळल्याने पुन्हा एकदा पालिका आरोग्य विभाग चिंतेत पडला आहे. गेल्या लाटेमध्ये धारावीत कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या नाकीनऊ आले होते.

 

अभिनेता जॉन अब्राहमनंतर एकता कपूरलाही लागण

 

अभिनेता जॉन अब्राहमपाठोपाठ आता एकता कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. सर्व काळजी घेतल्यानंतरही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्बेत ठिक आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी या आशायची पोस्ट शेअर केली आहे. तसेच एकता कपूरने स्वत:ला क्वारंटाइन केले आहे

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -