Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेलोकसभा/विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना कक्ष कार्यान्वित

लोकसभा/विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना कक्ष कार्यान्वित

आवश्यक कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी – जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष/उमेदवार/त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवानगी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येईल. हा कक्ष कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

तरी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.

संबंधित एक खिडकी कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या परवानग्या पुढीलप्रमाणे-

कार्यक्षेत्र- ठाणे जिल्हा, वाहन परवाना- १.नोंदणीकृत राजकीय पक्ष, २.नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी. परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (लोकसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.

कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, वाहन परवाना : उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६. चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८. वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.

कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, वाहन परवाना- उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.

कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष), ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १.संबंधित जागा मालक यांची संमती, २.स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३.पोलीस विभाग.

कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग.

कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ– कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग.

कार्यक्षेत्रलोकसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – 1. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग.

कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ– रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – 1. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग.

एकापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघातील मिरवणूक/रॅलीच्या परवानगीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र अर्ज करण्यात यावा, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

कार्यक्षेत्र-लोकसभा मतदारसंघ- स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र.

कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ – स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी कक्षातील सक्षम पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र.

कार्यक्षेत्र-ठाणे जिल्हा- हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवाना, परवानगी देणारे अधिकारी – अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र.

निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -