Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्गावरील रिक्षा व डंपर अपघातात मृत्यू झालेल्या ४ जणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून...

मुंबई-गोवा महामार्गावरील रिक्षा व डंपर अपघातात मृत्यू झालेल्या ४ जणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख रुपये मदतीची घोषणा

पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे सोमवारी रिक्षा व डंपर यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिक्षामधील चारही जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

पोलादपूर तालुक्याजवळ कशेडी घाटामध्ये सोमवारी रिक्षा व डंपरचा भीषण अपघात झाला. अपघातात एकूण ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, यात तीन मुलींचा समावेश आहे. पोलादपूर खेड येथून माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे परतत असताना रिक्षाचा अपघात झाला. खेड येथे परीक्षेसाठी जात असलेल्या गोरेगाव येथील विद्यार्थ्यांचा या अपघातात अंत झाला आहे. या अपघातात तीन मुली आणि एक रिक्षाचालक ठार झाला आहे. वाळूने भरलेला डंपर या रिक्षावर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला. हालीमा अब्दुल सलाम पोपेरे (२३ वर्ष, नांदवी) आसिया सिद्दीकी (२० वर्षे, गोरेगाव), नाजमीन मूफीद करबेलकर (२२ वर्ष, सवाद), अमन उमर बहुर (४६ वर्षे, गोरेगाव) यांचा मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -