Sunday, May 19, 2024
Homeदेशपूर, दलदलीतून बाहेर पडण्यासाठी दहा फूट उंचीचा ट्रॅक्टर

पूर, दलदलीतून बाहेर पडण्यासाठी दहा फूट उंचीचा ट्रॅक्टर

मुजफ्फरनगरच्या एका शेतकऱ्याचा देशी जुगाड

लखनऊ (वृत्तसंस्था) : सध्या एक ट्रॅक्टर ‘सोशल मीडिया’वर चर्चेचा विषय ठरला आहे. याचे कारण आहे या ट्रॅक्टरची उंची. हा ट्रॅक्टर दहा फूट उंच आहे. वैशिष्ट्य म्हणजे तो दलदल, कालवे, नदी आणि तलाव सहज पार करतो. हा ट्रॅक्टर मुजफ्फरनगरच्या एका शेतकऱ्याने देशी जुगाड करत बनवला आहे. सध्या हा अनोखा ट्रॅक्टर लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

सध्या ‘सोशल मीडिया’वर हा ट्रॅक्टर खूप व्हायरल होत आहे. मुजफ्फरनगर शहरातल्या भोपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या शुक्र तीर्थ इथे राहणारे जसवंत सिंह यांचा हा ट्रॅक्टर आहे. जसवंत यांनी २००२ मध्ये एका कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला होता; पण पावसाळ्यात शुक्र तीर्थक्षेत्रात वारंवार पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पिकांची नासाडी होते. याशिवाय पूरग्रस्त ग्रामीण भागाचा मुख्य रस्त्यांशी संपर्कही तुटतो. त्यामुळे शेतकरी जसवंत यांनी अनोखी शक्कल लढवत देशी जुगाड केला आणि ट्रॅक्टरची उंची वाढवली. त्यांनी या ट्रॅक्टरचा कायापालट केला. त्यांचा हा ट्रॅक्टर दहा फूट उंच आहे. या उंचीमुळे ट्रॅक्टर एखादा कालवा किंवा फार खोल नसलेला तलाव सहज पार करतो. तसंच दलदलीच्या क्षेत्रातूनही सहज बाहेर पडतो.

शेतकऱ्याने या ट्रॅक्टरची उंची देशी जुगाड करत पाच फूटावरून दहा फूट केली. त्यामुळे तो ऊस कापणी करण्यात मदत करतो. उत्तम उंचीमुळे हा ट्रॅक्टर दलदलीतून मार्ग काढत बाहेर पडतो. हा खास ट्रॅक्टर अतिशय शक्तिशाली ट्रॅक्टरच्या श्रेणीत मोडतो. हा ट्रॅक्टर प्रामुख्याने शेतीच्या कामांसाठी बनवण्यात आला आहे; पण मुजफ्फरनगरचे शेतकरी जसवंत सिंह यांनी आपल्या हुशारीने या ट्रॅक्टरला अनोखे रुप दिले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळून बसतात. सध्या ‘सोशल मीडिया’वर या दहा फूट उंच ट्रॅक्टरचे फोटो आणि व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. या ट्रॅक्टरची उंची पाहून नेटकरी चकीत झाले असून शेतकऱ्याचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -