Monday, May 6, 2024
Homeमहत्वाची बातमीBirth rate : पनवेलमध्ये घटतोय मुलींचा जन्मदर

Birth rate : पनवेलमध्ये घटतोय मुलींचा जन्मदर

‘लापता लडकिया’ च्या अहवालातून बाब समोर

नवीन पनवेल (वार्ताहर) : केंद्र शासनाने घटणारा मुलींचा जन्मदर (Birth rate) पाहता गर्भलिंग चाचणी विरोधी कायदा केला आहे. तर प्रत्येक राज्याने देखील त्याची अमलबजावणी केली आहे. तरीदेखील नवी मुंबई आणि रायगडमध्ये मुलींचा जन्मदर घसरला आहे.

‘लापता लडकिया’च्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेअंतर्गत ही बाब समोर आली आहे. शहरी बहुल समजल्या जाणाऱ्या पनवेलमध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर कमी असल्याचे नोंद महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

शासनाने जरी गर्भलिंग चाचणी विरोधी कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, हा एक प्रश्नच आहे. मध्यंतरी केलेल्या सर्व्हेनुसार, राज्यात ६ हजार ९३० सोनेग्रोफी मशिन होत्या. त्यापैकी दीड हजार रायगड आणि नवी मुंबई परिसरात होत्या. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मशिनच्या संख्या जास्त, त्या ठिकाणी मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत असल्याचे, ‘लापता लडकिया’ या अहवालातून उघड झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गर्भ निदान कायदा देखरेख समितीच्या अध्यक्ष वर्षा देशपांडे यांनी स्ट्रींग ऑपरेशन करून अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना तुरुंगात पाठवले, मात्र नवी मुंबई आणि रायगड परिसरात अशी धाडसत्रे फारशी झालेली नाहीत. काही वर्षांपूर्वी सोनोग्राफी मशिनच्या नोंदणीचे नूतनीकरण न करणे, माहिती अपडेट न ठेवणे आदींमुळे संशयाची सुई असलेल्या दोन वैद्यकीय व्यावसायिकांना पनवेल न्यायालयाने शिक्षाही ठोठावली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -