Saturday, May 11, 2024
Homeताज्या घडामोडीDhangar Samaj : मराठ्यांनंतर आता आरक्षणासाठी धनगर युवकाची आत्महत्या... खिशात आढळली एक...

Dhangar Samaj : मराठ्यांनंतर आता आरक्षणासाठी धनगर युवकाची आत्महत्या… खिशात आढळली एक चिठ्ठी

पश्चिम महाराष्ट्रात घडली घटना…

जत : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे पुढारी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटमला आता केवळ एक दिवस उरला आहे. यानंतर मराठा समाज आणखी पेटून उठण्याची शक्यता आहे. यात खेदाची बाब म्हणजे मराठा युवक आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide) करत आहेत. मुंबई, बीड, नांदेड या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावे म्हणून तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटना घडल्या. यानंतर आता धनगर समाजही (Dhangar Samaj) आक्रमक झाला असून पश्चिम महाराष्ट्रातील जत तालुक्यातील एका युवकाने धनगरांना आरक्षण मिळावे म्हणून शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

बिरुदेव वसंत खर्जे असं ३८ वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. तो जत तालुक्यात कुणीकोनूरमध्ये आबाचीवाडी येथे राहणारा होता. काल संध्याकाळी त्याचा मृतदेह शेतात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. बिरूदेवने धनगर आरक्षण मिळावे, माझ्या मृत्यूनंतर कोणालाही दोषी धरू नये व माझ्या कुटुंबाला कशाचा त्रास होऊ नये, अशा आशयाची चिठ्ठी खिशात ठेवून आपल्याच शेतात झाडाला गळफास घेतला. बिरुदेवची मुलगी शेताकडे पाण्याची मोटार बंद करण्यास निघाली होती. तिने बिरुदेवचा मृतदेह झाडावर पाहिला. मुलीने ही घटना घरच्यांना सांगितली.

नागरीक व पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा केला. रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. जत तालुक्यातील धनगर समाजबांधव रुग्णालयाजवळ जमले होते. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. मात्र पोलीस उपअधीक्षक सुनील शेळके यांनी प्राथमिक तपासात आरक्षणाच्या मागणीसाठी घटना घडल्याचे समोर आल्याचे सांगितले, त्यानंतर नोंद करण्यात आली. बिरुदेव यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -