Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीSikkim Rain : सिक्कीममध्ये पावसाच्या थैमानात महाराष्ट्रातील २८ जण अडकले!

Sikkim Rain : सिक्कीममध्ये पावसाच्या थैमानात महाराष्ट्रातील २८ जण अडकले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; अडकलेल्यांशी संपर्क साधत दिला धीर

डेहराडून : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. तर काही ठिकाणी मात्र अद्याप मान्सूनचे आगमन झाले नाही. राज्यासह देशभरातही वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची स्थिती वेगवेगळी आहे. त्यात सिक्कीममध्ये (Sikkim) मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. याठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस (Heavy rains) झाला आहे. या पावसामुळे १५०० ते २००० पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) देखील अनेक पर्यटक अडकल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांशी फोनवरुन संवाद साधला. या सर्व अडकलेल्या पर्यटकांची विचारपूस करुन त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला आहे. सध्या २८ जणांचा एक ग्रुप सिक्कीम येथील लाचोंग या ठिकाणी अडकला असून, त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ताबडतोब अडकलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पुरवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

राज्य प्रशासन लागले कामाला

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर प्रशासन कामाला लागले आहे. अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सिक्कीमध्ये अडकलेल्या २८ जणांना सीएमओ तसेच सिक्कीम सरकारकडून देखील मदतीसाठी फोन आले आहेत. त्यांना हवी ती मदत तातडीने पुरवली जाणार आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी दोन हेलिकॉप्टर तयार आहेत. परंतु, ढग आणि ख़राब हवामानामुळे त्यात अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातली टीम रेग्युलर टीमच्या सतत संपर्कात आहे.

सिक्कीममध्ये पावसाचे थैमान

सध्या सिक्कीममध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेनंतर निवेदन जारी केले होते. त्यात सिक्कीममध्ये सरकारने मदत आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देण्यासाठी पावले उचलली आहेत. पिडित कुटुंबियांना आवश्यक असलेली मदत आणि तात्पुरती व्यवस्था तसेच आवश्यक असलेली मदत देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -