मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं आहे. १५ जुलै २०२६ रोजी अनन्याने अखेरचा श्वास घेतला. मात्र, तिच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी आता सोशल मीडियावर दिली आहे. अभिनेत्री गेल्या वर्षभरापासून शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंज देत होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. (Actress Ananya Raj)
कुटुंबीयांनी सोशल मीडियावर दिली माहिती :
अनन्या राजच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कुटुंबीयांनी तिच्या निधनाची माहिती शेअर केली. या पोस्टमध्ये अनन्याने १५ जुलै रोजी झोपेतच अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षभरापासून ती शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आजाराशी सामना करत होती. या परिस्थितीतून सावरण्यासाठी तिने दीर्घकाळ प्रयत्न केले. कुटुंबीयांनी तिच्या धैर्याचे स्मरण करत तिच्या आत्म्याला शांती लाभावी, अशी भावना व्यक्त केली आहे. (Actress Ananya Raj)
मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली. त्यातलंच एक नाव म्हणजे 'विनोद कांबळी'. ...
कोण होती अनन्या राज?
अनन्या राजचा जन्म १० ऑगस्ट १९९८ रोजी झाला होता. मुंबईत वाढलेल्या अनन्याने मनोरंजन क्षेत्रात अभिनय आणि म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून प्रवेश केला. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत तिने आपली ओळख निर्माण केली. तिने ‘7 Hours to Go’ (2016) आणि ‘The Final Exit’ (२०१७) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ‘Ghost’ (2019) या चित्रपटातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. हिंदी चित्रपटांसोबतच तिने वेब सीरिज, शॉर्ट फिल्म्स आणि काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केल्याची माहिती आहे. (Actress Ananya Raj)
मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला अभिनेता अश्विन मुश्रान याच्या कारचा अपघात ...
काही काळापासून होती इंडस्ट्रीपासून दूर :
अनन्या राज गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वापासून दूर होती. सोशल मीडियावरही तिची सक्रियता कमी झाली होती. त्यामुळे तिच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली आहे. अनन्या राजच्या कुटुंबीयांनी तिच्या निधनाचे कारण म्हणून गेल्या वर्षभरातील शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांचा उल्लेख केला आहे. (Actress Ananya Raj)




