Sunday, October 11, 2026

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय भारताने दोन दिवसांत नऊ विकेट गमावून ४६० धावा केल्या आहेत. भारताकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक १६७ तर केएल राहुलने ८२ आणि ध्रुव जुरेलने ५१ धावा केल्या. कुलदीप यादव (१२ धावा) आणि प्रसिद्ध कृष्णा (एक धाव) खेळत आहेत.

सलग दोन्ही दिवशी पावसामुळे गॉल कसोटीचा बराच वेळा वाया गेला. पहिल्या दिवशी वाया गेलेल्या वेळेची भरपाई म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ऐवजी ९.४५ वाजता सामना सुरू करण्याचे आणि दिवसभरात किमान ९८ षटके टाकण्याचे नियोजन होते. पण पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ उशिरा सुरू झाला. तब्बल ५५ षटकांचा वेळ वाया गेला. नंतर केशरा नुवान्थाने तीन बळी घेऊन भारताला मोठा धक्का दिला. यातून सावरण्यास वेळ लागला. भारतीय संघाने आदल्या दिवशीच्या धावसंख्येत १७२ धावांची भर घातली.

आदल्या दिवशीच्या २ बाद २८८ धावांवरून भारताने पुढे सुरुवात केली. ऋषभ पंतने एका आखूड चेंडूला मिड-विकेटच्या दिशेने चौकार मारून चांगली सुरुवात केली. खेळाच्या पहिल्या अर्ध्या तासात भारताने सावध खेळ करत २०० धावांचा टप्पा ओलांडला. पण श्रीलंकेने दुसरा नवा चेंडू घेतला आणि चित्र बदलले. पंत बाद झाला. शनिवारी पायात पेटके आल्यामुळे मैदानाबाहेर गेलेला केएल राहुल पुन्हा खेळण्यासाठी आला. पण नुवान्थाच्या वळणाऱ्या चेंडूवर त्याने सरळ शॉर्ट लेगला झेल दिला. तो स्वतःच्या धावसंख्येत फक्त पाच धावांचीच भर घालू शकला.

नवीन चेंडू घेतल्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. ठराविक अंतराने भारतीय खेळाडू बाद होत होते त्यामुळे वेगाने धावा वाढवण्याच्या भारताच्या योजनेला फटका बसला. दुसऱ्य दिवशीच्या दुसऱ्या सत्रात तीन खेळाडू बाद झाले. वान्थाविरुद्ध चुकीच्या रेषेवर खेळताना जडेजा पायचीत झाला आणि भारताची स्थिती ६ गडी बाद ३७७ झाली. ध्रुव जुरेलचा २९ धावांवर मिळालेला झेल पकडण्यात स्लीपमध्ये असलेला धनंजय डी सिल्वा अयशस्वी झाला. याचा फायदा घेत जुरेलने अर्धशतक केले. दिवसाच्या उत्तरार्धात जुरेल आणि मानव सुथार यांनी यजमानांना चांगलीच झुंज दिली. त्यांनी लाहिरू कुमाराच्या अनियमित टप्प्यावर फटकेबाजी करत धावा वाढवल्या. एकाच षटकात तीन चौकार मारून त्यांनी संघाला ४०० पार नेले.

जुरेलने अर्धशतक केले पण लगेच स्लिपमध्ये एक अप्रतिम झेल पकडून श्रीलंकेने चूक सुधारली. खालच्या फळीतील फलंदाजांनी जास्त धावा केल्या नाही. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी थोडी फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने नऊ विकेट गमावून ४६० धावा केल्या. आता सामन्याचे तीन दिवस शिल्लक आहेत. पण पावसाची शक्यता विचारात घेता जिंकण्यासाठी भारताला वेग आणि स्वतःचा प्रभाव वाढवणे आवश्यक आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत नऊ बाद ४६० धावा. देवदत्त पडिक्कल १६७, केएल राहुल ८२, ध्रुव जुरेल ५१; प्रभात जयसूर्या ४-१०९, केशरा नुवंता ३-१७५

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >