NEET Paper Leak : NEET पेपरफुटीचा भांडाफोड! 'CCTVपासून कोऱ्या कागदांपर्यंत...'; पेपरफुटी प्रकरणात CBIची मोठी कारवाई; NTAच्या ३ तज्ज्ञांविरुद्ध आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET-UG परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाच्या तपासानंतर CBIने विशेष न्यायालयात ९४ पानी आरोपपत्र दाखल केले असून, त्यात राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) तीन तज्ज्ञांचा पेपरफुटीच्या मुख्य स्रोतांमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (NEET Paper Leak)


CBIच्या आरोपपत्रानुसार पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र), मनीषा संजय हवालदार (भौतिकशास्त्र) आणि मनीषा गुरुनाथ मांढरे (वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र) हे तिघे पेपरफुटीच्या साखळीतील महत्त्वाचे दुवे होते. या प्रकरणात एकूण १३ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. (NEET Paper Leak)



NTAच्या पेपर सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघड :


CBIने NTAच्या कार्यपद्धतीतील अनेक त्रुटींवर बोट ठेवले आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रश्न तयार करणे, नियंत्रण, तपासणी-पडताळणी आणि भाषांतर असे वेगवेगळे टप्पे असतात. प्रत्येक टप्पा स्वतंत्र तज्ज्ञांकडून हाताळला जाणे अपेक्षित आहे. मात्र, तपासात काही तज्ज्ञांचा एकापेक्षा अधिक टप्प्यांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे एका व्यक्तीला प्रश्नपत्रिकेच्या मोठ्या भागाची माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली, असा निष्कर्ष CBIने नोंदवला आहे. (NEET Paper Leak)


याशिवाय NTAच्या गोपनीय विभागात अंगझडती आणि तपासणीची पुरेशी व्यवस्था नसणे, CCTV देखरेखीत त्रुटी आणि थेट CCTV प्रक्षेपणासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाचा अभाव यामुळे प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे CBIने म्हटले आहे. (NEET Paper Leak)



१३५ रसायनशास्त्राचे प्रश्न चिठ्ठ्यांवर लिहिल्याचा आरोप :


CBIच्या आरोपपत्रातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पी. व्ही. कुलकर्णी यांनी गोपनीय विभागात कच्च्या कामासाठी देण्यात आलेल्या कोऱ्या कागदांचा कथित गैरवापर केला. आरोपपत्रानुसार, त्यांनी रसायनशास्त्राच्या पेपरमधील तब्बल १३५ प्रश्न छोट्या चिठ्ठ्यांवर लिहून घेतले आणि ते गुप्तपणे बाहेर नेले. हॉटेलमध्ये परतल्यानंतरही प्रश्न लिहून काढल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. (NEET Paper Leak)



तज्ज्ञांकडून मध्यस्थांपर्यंत पोहोचला पेपर :


CBIच्या तपासानुसार, तज्ज्ञांकडून मिळालेले प्रश्न पुढे मध्यस्थ आणि सहाय्यकांच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्यात आले. या साखळीत तेजस हर्षदकुमार शहा, डॉ. मनोज भगवानराव शिरुरे, शिवराज मोटेगावकर आणि धनंजय निवृत्ती लोखंडे यांच्यासह अन्य व्यक्तींचा सहभाग असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. CBIच्या मते, या साखळीच्या पुढील टप्प्यात शुभम मधुकर खैरनार, मंगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल आणि हरियाणातील यश यादव यांच्यामार्फत प्रश्न परीक्षार्थींपर्यंत पोहोचवण्यात आले. (NEET Paper Leak)



कोणाची काय भूमिका?


पी. व्ही. कुलकर्णी : रसायनशास्त्रातील प्रश्न छोट्या चिठ्ठ्यांवर लिहून NTAच्या कार्यालयाबाहेर नेल्याचा आरोप.


मनीषा मांढरे : दिवसभराचे काम पूर्ण केल्यानंतर हॉटेलमध्ये परतून NCERTच्या पाठ्यपुस्तकांतील संबंधित परिच्छेद चिन्हांकित करत असल्याचे तपासात समोर आल्याचा CBIचा दावा.


मनीषा हवालदार : दिल्लीतील निवासस्थानी परतल्यानंतर प्रश्न थोडक्यात लिहून ठेवत असल्याचा आरोप.


मनीषा वाघमारे : आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात प्रश्नफुटी आणि वितरणातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असल्याचा आरोप. उमेदवार आणि विषयतज्ज्ञांमधील दुवा म्हणून भूमिका बजावल्याचे CBIने म्हटले आहे.


शुभम खैरनार : फुटलेल्या रसायनशास्त्राच्या प्रश्नांचा पुरवठा आणि समन्वय केल्याचा आरोप.



डिजिटल पुरावेही तपासाचा आधार :


CBIने हे आरोपपत्र मोठ्या प्रमाणातील डिजिटल न्यायवैद्यक पुराव्यांवर आधारित असल्याचे सांगितले आहे. यामध्ये पुण्यातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या अ‍ॅक्सेस-कंट्रोल अ‍ॅपमधील नोंदींचाही समावेश आहे. आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंधित या डिजिटल नोंदींचा तपासात वापर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. (NEET Paper Leak)


दरम्यान, पेपरफुटीची संपूर्ण साखळी तज्ज्ञांपासून मध्यस्थांमार्फत परीक्षार्थींपर्यंत पोहोचल्याचा दावा CBIने केला आहे. त्यामुळे NEET-UG परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेवर आणि NTAच्या अंतर्गत कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (NEET Paper Leak)

Comments
Add Comment

Vijay and Sangeetha Divorce : 'थलापती' विजय यांच्या संसाराचे वादळ शमले; पत्नी संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे

तामिळनाडू : अभिनेते तथा तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या पत्नी संगीता यांनी दाखल केलेला

Kiren Rijiju Statement on Amit Shah : 'ज्या दिवशी अमित शाह उत्तर देतील, ते तुम्हाला ऐकताही येणार नाही!' किरेन रिजिजूंचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही

Redmi Note 17 5G Launched : Redmi Note 17 5G भारतात लाँच; ८०००mAh ची तगडी बॅटरी अन् ५०MP कॅमेरा, पाहा किमतीसह सर्व फीचर्स!

नवी दिल्ली : प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या लोकप्रिय रेडमी नोट सिरीजचा विस्तार करत भारतीय बाजारात

Kochi Flight Emergency Door News : कोचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न; प्रवाशांमध्ये घबराट, केरळमधील तरुणाला अटक!

कोची : मलेशियाची राजधानी कुआलालंपूरहून केरळच्या कोची शहराकडे येणाऱ्या विमानात बुधवारी रात्री एका प्रवाशाच्या

IRCTC Japan Tour Package : IRCTC ची भन्नाट ऑफर : दिल्ली ते जपान १० दिवसांची मस्त सफर; टोकियो, ओसाका अन् हिरोशिमा फिरण्याची संधी!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'ने (IRCTC) परदेशात

Assam Crime News : आसाम हादरले! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; विटांनी ठेचून अत्यंत निघृण हत्या

हैलाकांडी : ईशान्य भारतातील आसाम (Assam) राज्यामधून एका अत्यंत भयानक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून