नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या आकारामुळे भविष्यातील पुरांचा धोका वाढत असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) उपग्रह अभ्यासातून समोर आले आहे. १९८४ ते २०२३ या कालावधीतील उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासानुसार, २०१६-१७मध्ये ओळखल्या गेलेल्या १० हेक्टरपेक्षा मोठ्या २,४३१ हिमनदीय सरोवरांपैकी ६७६ सरोवरांचा आकार लक्षणीयरीत्या वाढला आहे. यातील ६०१ सरोवरांचा आकार दुपटीपेक्षा अधिक वाढला, तर १० सरोवरांचा आकार दीड ते दोन पट आणि ६५ सरोवरांचा आकार सुमारे दीड पट वाढल्याचं ISROने नमूद केलं आहे. वाढलेल्या ६७६ सरोवरांपैकी १३० सरोवरे भारतात आहेत. यातील ६५ सिंधू, ७ गंगा आणि ५८ ब्रह्मपुत्रा नदीखोऱ्यात आहेत.
नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाने घडवलेल्या भीषण तांडवामुळे हजारो भाविक आणि पर्यटक संकटात सापडले आहेत. ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून ...
सरोवर फुटल्यास काय होऊ शकतं?
हिमनदीच्या वितळण्यामुळे तयार झालेल्या सरोवरांना नैसर्गिक बंधारे असतात. हे बंधारे बर्फ, माती, दगड किंवा हिमनदीने मागे सोडलेल्या मोरेनपासून तयार झालेले असू शकतात. भूस्खलन, हिमस्खलन, अतिवृष्टी किंवा इतर कारणांमुळे हे नैसर्गिक बंधारे तुटल्यास सरोवरातील मोठ्या प्रमाणातील पाणी अचानक खाली येऊ शकतं. याला Glacial Lake Outburst Flood म्हणजेच GLOF म्हटलं जातं. अशा पुराचा वेग आणि त्यासोबत वाहून येणारा गाळ, दगड-माती यामुळे नदीखोऱ्यातील पायाभूत सुविधा आणि वस्तीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
मुंबई : सोशल मीडिया स्टार ओरहान अवत्रामणी म्हणजेच सर्वांचा लाडका 'ओरी' (Orry) सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या वर्तुळात आला आहे. ...
२०२३मध्ये सिक्कीममध्ये काय घडलं?
याचा धक्कादायक अनुभव ऑक्टोबर २०२३मध्ये सिक्कीमला आला. उत्तर सिक्कीममधील South Lhonak Lake फुटल्यानंतर तीस्ता नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पूर आला. ISROच्या उपग्रह निरीक्षणानुसार, २८ सप्टेंबर २०२३ रोजी या सरोवराचं क्षेत्रफळ सुमारे १६७.४ हेक्टर होतं. ४ ऑक्टोबरला GLOFनंतर ते सुमारे ६०.३ हेक्टर राहिलं. म्हणजे जवळपास १०५ हेक्टर क्षेत्रातील पाणी बाहेर पडलं, ज्यामुळे downstream भागात अचानक पूर निर्माण होण्यास हातभार लागला. या घटनेनंतर हिमालयातील इतर हिमनदीय सरोवरांकडेही अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पणासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दिंडोरीतील कर्मयोगी दुलाजी ...
सर्व सरोवरे धोकादायक आहेत का?
मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. २,४३१ सरोवरे म्हणजे २,४३१ संभाव्य ‘टाइम बॉम्ब’ आहेत, असा अर्थ नाही. ISROच्या अभ्यासात या सरोवरांचा आकार आणि त्यातील बदल नोंदवण्यात आला आहे; प्रत्येक सरोवराला तातडीने GLOFचा धोका आहे, असा निष्कर्ष काढलेला नाही. धोका निश्चित करण्यासाठी सरोवराचा आकार, पाण्याची वाढ, नैसर्गिक बंधाऱ्याची रचना, परिसरातील भूस्खलन किंवा हिमस्खलनाची शक्यता आणि खालील भागातील लोकवस्ती यांसारख्या अनेक घटकांचा अभ्यास करावा लागतो. ISROच्या अभ्यासात वाढलेल्या ६७६ सरोवरांपैकी ३०७ मोरेन-डॅम्ड, २६५ erosion-related, ८ ice-dammed आणि ९६ इतर प्रकारची असल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी ३१४ सरोवरे ४,००० ते ५,००० मीटर उंचीवर, तर २९६ सरोवरे ५,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहेत.
नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एअर इंडियाने मणिपूरमधील एका होतकरू भाऊ-बहिणीची प्रेरणादायी कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे, ...
उपग्रहांमुळे धोका ओळखणं शक्य
हिमालयाचा दुर्गम आणि खडतर भूभाग पाहता प्रत्येक सरोवरापर्यंत प्रत्यक्ष पोहोचून सातत्याने निरीक्षण करणं कठीण आहे. त्यामुळे उपग्रह रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरतं. दीर्घकाळातील उपग्रह प्रतिमांमधून सरोवराचा आकार, त्याचा विस्तार आणि परिसरातील बदलांचा अभ्यास करता येतो. मात्र केवळ उपग्रह निरीक्षण पुरेसं नाही. धोकादायक मानल्या जाणाऱ्या सरोवरांच्या नैसर्गिक बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी, पाण्याची पातळी आणि आसपासच्या भूभागातील बदलांचं निरीक्षणही आवश्यक आहे. हिमालयातील हिमनदीय सरोवरांचा वाढता विस्तार हा तातडीने घाबरण्याचा विषय नसला, तरी सतत निरीक्षण, वैज्ञानिक मूल्यांकन आणि प्रभावी पूर्वसूचना व्यवस्था ही भविष्यातील GLOFचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 2023च्या South Lhonak घटनेने याचं गांभीर्य आधीच दाखवून दिलं आहे.