नवी दिल्ली : भारत आपली सुरक्षा यंत्रणा सातत्याने आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी भारताकडून वेगवेगळे निर्णय घेतले जातात. आता भारत अमेरिकेकडून ‘जॅव्हेलिन’ अँटी-टँक क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीत आहे. भारतीय लष्कराने अमेरिकेच्या फॉरेन मिलिटरी सेल्सच्या प्रक्रियेद्वारे जॅव्हेलिन हे अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी लेटर ऑफ ऑफर अँड ॲक्सेप्टन्सवर स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या मते या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक दृढ होण्यास मोठी मदत होईल. हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्यासाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. यावर भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी प्रतिक्रिया देत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांमधील हे मोठं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. (Javelin Missile)
काठमांडू : भारत आणि नेपाळ यांच्यात ऊर्जा सहकार्य करार आहे. या करारांतर्गत नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणारी आठशे मेगावॅट वीज भारत ...
“जॅव्हेलिन ही युद्धात आपली क्षमता सिद्ध केलेली ‘अँटी-टँक’ (रणगाडा-विरोधी) प्रणाली भारत खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संरक्षण संबंधांमधील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यामुळे संयुक्त उत्पादनाच्या शक्यता देखील निर्माण झाल्या आहेत. तसेच दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी मजबूत आणि सर्वोत्तम झाले आहे”, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली आहे. (Javelin Missile)
जेव्हलिन अँटी-टँक गाईडेड मिसाइल (एटीजीएम) खांद्यावरून मारा करणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. हे एक पोर्टेबल रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे, जे टाक्या, चिलखती वाहने आणि बंकर नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. भारताला देण्यात येणाऱ्या या क्षेपणास्त्रांचं मूल्य अंदाजे ४५.७ दशलक्ष डॉलर्स आहे आणि त्यात क्षेपणास्त्रे तसेच प्रक्षेपण युनिट्सचा समावेश आहे. यात FGM-१४८ क्षेपणास्त्रे, २५ जेव्हलिन लाइटवेट कमांड लॉन्च युनिट्स आदींचा समावेश आहे. (Javelin Missile)