Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२ तासांत मारहाण करत असलेल्या पुरुषाला अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली.



रेल्वे पोलिसांनी गुरुवार ६ ऑगस्ट २०२६ पासून सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल असल्याचे बघितले. या व्हिडीओत लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेला पुरुष स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागताच रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर व्हायरल व्हिडीओतील घटना ही बुधवार ५ ऑगस्ट २०२६ ही रोजीची असल्याचे लक्षात आले. गोरेगाव येथून सीएसएमटीच्या दिशेने जात असलेल्या लोकलमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता जोगेश्वरी स्टेशनवरून मोहमद रिझवान अन्सारी चढला. या ३६ वर्षांच्या गोवंडीत राहणाऱ्या व्यक्तीनेच त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेशी सीटवर बसण्याच्या मुद्दयावरून वाद घातला. आरोपीने महिलेचा विनयभंग केला. महिलेला अश्लील शिव्या दिल्या. प्रवाशांच्या उपस्थितीत महिला प्रवाशाला मारहाण केली. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला. अखेर आरोपीला गोवंडीतून अटक करण्यात आली. पण आरोपीला ओळखण्यासाठी पीडित महिला समोर येत नव्हती.



ओळख परेड झाली नाही तर आरोपीच्या सुटकेचा मार्ग मोकळा होईल हे लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी पीडित महिलेचा शोध सुरू केला. व्हायरल व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फूटेज यांच्या मदतीने अखेर महिलेचा शोध घेण्यात आला. अंधेरी रेल्वे पोलिसांनी महिलेला शोधले आणि तिच्याशी संपर्क साधला. यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी आणि पीडित महिला या दोघांची चौकशी केली. अखेर पीडितेने आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.



रेल्वेच्या पोलीस उपआयुक्त सुनिता ठाकरे आणि वांद्रे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनात वडाळा रेल्वे पोलीस आणि अंधेरी रेल्वे पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली.




Comments
Add Comment

Pune-Mumbai Highway : काळोखात भरधाव कारचा भीषण अपघात; ओढ्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Chinchpoklicha Chintamani Aganman 2026 : आला आला आला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आला! उद्या भव्य आगमन सोहळा; काय आहे वेळ, मार्ग अन् गर्दीचे नियोजन ? जाणून घ्या

मुंबई : मुंबईतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा (Chinchpoklicha Chintamani Agaman Sohla 2026) बहुप्रतिक्षित

Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी

Pune News : 'MH 12' ची जागा आता 'MH 61' ने घेतली; व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी  

पुणे: पुणेकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली 'MH 12' वाहन नोंदणी मालिका संपल्यानंतर पुणे प्रादेशिक

Eknath Shinde : रिक्षा चालकांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज नाहीत!

- आशिष शेलार; मुंबईच्या महापौर पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती नाही मुंबई : रिक्षा आणि

Disha Salian death case : १४ व्या मजल्यावरून पडूनही दिशा सालियनच्या अंगावर जखमा कशा नाहीत?

- उच्च न्यायालयाचा सवाल; दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण, निकाल ठेवला राखून मुंबई : बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू