New Delhi : नवी दिल्लीत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दाम्पत्याला अटक

मोहम्मद साहिल व समिराकडून केले जप्त 8 भारतीय सिमकार्ड


नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित हेरगिरी नेटवर्कविरोधात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद साहिल आणि त्याची पत्नी समीरा हे 2024 पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर एजंटांच्या संपर्कात होते आणि या नेटवर्कसाठी काम करत होते. (New Delhi)


दिल्ली पोलिसांनी या कारवाईला ‘ऑपरेशन समीरा’ असे नाव दिले आहे. तपासादरम्यान दाम्पत्याने 2024 आणि 2025 या कालावधीत 8 भारतीय सिमकार्ड मिळवून ती दुबईमार्गे पाकिस्तानला पाठवल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या सिमकार्डचा वापर पाकिस्तानमध्ये व्हॉटसएप्प अकाउंट चालवण्यासाठी, भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी आणि संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी करण्यात आल्याचा संशय आहे. याच्या मोबदल्यात दोघांना सुमारे 30 हजार रुपये देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (New Delhi)



इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानच्या संपर्कात


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या नॉर्दर्न रेंजला यापूर्वीच दिल्ली-एनसीआरमध्ये काही व्यक्ती दहशतवादी संघटनांना कथित लॉजिस्टिक मदत करत असल्याची माहिती मिळाली होती. याच तपासादरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये आयएसआय समर्थित नेटवर्क सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासानुसार, साहिल 2024 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याची मैत्रीण समीरा हिचाही या संपर्कात सहभाग झाला. पुढे हा संपर्क एका कथित पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) पर्यंत पोहोचला. या व्यक्तीने दोघांना कथित नेटवर्कसाठी काम करण्यास प्रवृत्त केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याबदल्यात आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. (New Delhi)



भारतीय सिमकार्ड पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साहिल आणि समीरा यांनी 2024-25 या कालावधीत एकूण 8 भारतीय सिमकार्ड मिळवले आणि ती दुबईमार्गे पाकिस्तानला पाठवली. या सिमकार्डवर पाकिस्तानातून व्ह़ॉटसऍप्प अकाउंट चालवण्यात आले आणि भारतीय नागरिकांशी संपर्क साधून महत्त्वाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.या क्रमांकांच्या माध्यमातून काही भारतीय व्हॉटसएप्प ग्रुपमध्येही प्रवेश करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण नेटवर्कचा उद्देश माहिती गोळा करून ती पाकिस्तानातील हँडलर्सपर्यंत पोहोचवणे होता का, याचा तपास सुरू आहे. (New Delhi)


कॅन्टोन्मेंट परिसराची रेकी; सैन्याची माहिती गोळा केली या तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, साहिलला कॅन्टोन्मेंट परिसरांची रेकी करण्याचे तसेच नेटवर्कसाठी इतर व्यक्तींना जोडण्याचे काम देण्यात आले होते.साहिलने ज्या लष्करी जवानांविरोधात कोर्ट मार्शलची कारवाई सुरू होती, त्यांच्याशी संबंधित माहितीही कथितरित्या शेअर केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ सिमकार्ड आणि सोशल मीडिया व्यवहारांपुरता मर्यादित न राहता लष्करी ठिकाणे आणि संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती या दिशेनेही विस्तारला आहे. (New Delhi)



मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासातून नेटवर्कचा उलगडा


पोलिसांनी सर्वप्रथम साहिलला अटक केली. तो सराय काले खान परिसरातील रहिवासी असून त्याचे वडील कार मेकॅनिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. साहिलच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासादरम्यान पाकिस्तानी हँडलर्ससोबत झालेल्या संशयास्पद चॅट आणि संभाषणांचा तपशील समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.या डिजिटल पुराव्यांच्या आधारे चौकशी करण्यात आली. त्यानंतर साहिलची पत्नी समीरा हिची कथित भूमिका समोर आली आणि तिलाही अटक करण्यात आली. समीरा नोएडातील एका कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती आहे.


मोहम्मद साहिल आणि समिराच्या मोबाईल फोनमधून पाकिस्तानी हँडलर्ससोबत झालेल्या कथित संभाषणाशी संबंधित महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्पेशल सेल आता या नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्ती, आर्थिक व्यवहार, सिमकार्डचा पुरवठा आणि कथितरित्या पाकिस्तानपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या संपूर्ण यंत्रणेचा तपास करत आहे.या कथित हेरगिरी नेटवर्कची संपूर्ण साखळी उघड करणे, संवेदनशील माहिती नेमकी कोणापर्यंत पोहोचली आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास आता दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. (New Delhi)

Comments
Add Comment

Flood situation in Nepal : पूरग्रस्त नेपाळसाठी भारताची ‘एअर रिलीफ’; वायुसेनेने पोहोचवली 47.5 टन मदत

नवी दिल्ली : नेपाळमध्ये हिमनदीचा मोठा भाग तुटल्याने आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या हानीचा सामना

Citizens from Maharashtra stranded in Nepal : सागात अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

सागा : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले

Glaciers in the Himalayas : हिमालयात लपलेत २४३१ ‘धोक्याची सरोवरे’; फुटली तर माजू शकतो महापूर

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या

Nepal Flood Update : ६० वा वाढदिवस साजरा करायला गेले अन्... नेपाळमधील महापुरात अमेरिकेतील भारतीय दांपत्य बेपत्ता, मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाने घडवलेल्या भीषण तांडवामुळे हजारो भाविक आणि पर्यटक संकटात सापडले

Viral 'brother-sister' : ३५ हजार फूट उंचीवरही राखीचं नातं; एअर इंडियाचे भाऊ-बहिण बनले सहकारी, कहाणी होतेय व्हायरल

नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एअर इंडियाने मणिपूरमधील एका होतकरू भाऊ-बहिणीची

Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी