Nepal Flood Update : ६० वा वाढदिवस साजरा करायला गेले अन्... नेपाळमधील महापुरात अमेरिकेतील भारतीय दांपत्य बेपत्ता, मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाने घडवलेल्या भीषण तांडवामुळे हजारो भाविक आणि पर्यटक संकटात सापडले आहेत. ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले दीपक अहुजा आणि त्यांची पत्नी मधू अहुजा हे भारतीय वंशाचे दांपत्य या महापुरात बेपत्ता झाले आहे. दीपक यांचा ६० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि धार्मिक प्रवास पूर्ण करण्यासाठी हे दांपत्य अमेरिकेतील टेक्सस येथून आले होते. यात्रा अंतिम टप्प्यात असताना आणि दोघेही मायदेशी म्हणजेच डल्लासला परतण्याच्या तयारीत असतानाच, नेपाळ-तिबेट सीमेवरील जिरोंग (गीरोंग) पोर्टजवळ आलेल्या भीषण महापुरात ते अडकले. पूर येण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीशी फोनवरून संवाद साधून निघत असल्याचे सांगितले होते, मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.



टेक्ससमध्ये राहणाऱ्या अहुजा यांच्या दोन्ही मुली सध्या आपल्या आई-वडिलांच्या एका फोन कॉलची किंवा सुरक्षित बातमीची अत्यंत आशेने वाट पाहत आहेत. आठवड्याच्या शेवटी एकत्र वेळ घालवण्याचे नियोजन असलेल्या मुलींनी पालकांच्या शोधासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय, तसेच भारत, नेपाळ आणि चीनमधील दूतावासांशी तातडीने संपर्क साधला आहे. दरम्यान, या घटनेवर ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, जिरोंग परिसरात अडकलेल्या सुमारे ८० भाविकांच्या समूहासाठी भारत आणि चीन सरकारकडे तातडीने बचाव पथके तैनात करण्याची विनंती केली आहे.


या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ३५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, १ हजारांपेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत, ज्यात २८८ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २१ भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले, तरी दार्चेन, झुतुलफुक आणि जिलॉन्ग या भागांत अजूनही अनेक भारतीय अडकले आहेत. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांच्यानुसार तिमुरे गाव आणि चीनच्या गीरोंग पोर्ट परिसराला या पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, तिथे अडकलेल्या १५०० हून अधिक प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments
Add Comment

Glaciers in the Himalayas : हिमालयात लपलेत २४३१ ‘धोक्याची सरोवरे’; फुटली तर माजू शकतो महापूर

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या

Viral 'brother-sister' : ३५ हजार फूट उंचीवरही राखीचं नातं; एअर इंडियाचे भाऊ-बहिण बनले सहकारी, कहाणी होतेय व्हायरल

नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एअर इंडियाने मणिपूरमधील एका होतकरू भाऊ-बहिणीची

Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी

Karnataka teachers suspended : RSS च्या पथसंचालनात सहभाग घेणं पडलं महाग! कर्नाटकातील २ सरकारी शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई

कर्नाटक : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यात शिक्षण विभागाने दोन सरकारी शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक