मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मागे घेण्यात आले.जवळपास ३७ दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांसह अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला होता.आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची ग्वाही दिली.या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंबई : कलर्स टीव्हीचा (Colors TV) लोकप्रिय कॉमेडी कुकिंग शो (Comedy Cooking Show) 'लाफ्टर शेफ्स सीझन 3' (Laughter Chefs Season 3) अखेर संपन्न झाला असून अभिनेता अली गोनी (Aly Goni) आणि अभिनेत्री ...
आंदोलन संपल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन केले. केवळ एका आंदोलनामुळे देश ठप्प शकत होऊ नाही देशाला भविष्याच्या दिशेने प्रगती करावी लागेल असं ही त्यांनी म्हटल आहे.व्हिडिओत अनुपम खेर म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची लोकशाहीत दखल घेण्यात आली,ही सकारात्मक बाब आहे.मात्र,आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वापरण्यात आलेल्या अपमानास्पद आणि अश्लील भाषेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
मतभेद आणि टीका लोकशाहीचा भाग असला तरी कोणत्याही निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच,प्रश्न विचारणे आणि सरकारला जाब विचारणे आवश्यक असले तरी त्यासाठी सभ्य भाषेचा वापर होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे खेर म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी मतभेद व्यक्त करताना सभ्य भाषा आणि सुसंस्कृत वर्तन राखण्याचे आवाहन केले.एखाद्या देशाची ओळख केवळ त्याच्या नेत्यांमुळे नव्हे,तर नागरिकांच्या भाषा,संस्कार आणि आचरणामुळेही ठरत असते,असे सांगत "मतांमध्ये भिन्नता असू शकते,पण मनांमध्ये दुरावा नसावा,"असा संदेश अनुपम खेर यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिला





