तलावात मित्रांसोबत पोहायला गेला अन् परतलाच नाही; १० वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईतील (Mumbai) अंधेरी (पश्चिम) (Andheri West) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येक आहे. एका तलावात पोहताना १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. ही घटना डी.एन. नगर येथील जागृत हनुमान मंदिरामागील वायरलेस कंपाऊंड परिसरातील खासगी मालकीच्या तलावात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास, जवळच्या झोपडपट्टीतील दोन ते तीन मुले तलावात पोहण्यासाठी गेली होती. तलावात पोहताना एका मुलाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बूडू लागला. या घटनेची बाब लक्षात येताच, रहिवाश्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ( Child Drowning)
बारामती: भारतीय रेल्वेच्या दूरदर्शी 'अमृत भारत स्टेशन योजने' (Amrit Bharat Scheme) अंतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील बारामती रेल्वे स्थानकाचा आधुनिक आणि ...
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस(Police) आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. मुलाला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते.
मुंबई अग्निशमन दलाकडून तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहिमनेदरम्यान मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडालेल्या मुलाची ओळख दिनेश बसवराज हरिजन (वय १०) अशी पटली आहे. दिनेश आपल्या मित्रांसोबत तलाबात पोहण्यासाठी आला होता. तेवढ्यात ही दुर्घटना घडली.
पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ...
या घटनेनंतर संबंधित परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.






