पाणीचोरी रोखण्यासाठी सरकारची विशेष मोहीम - मंत्री सामंत
मुंबई : मुंबई शहरातील पाणीटंचाई आणि पाणीचोरीच्या समस्येवर आज विधान परिषदेत गंभीर चर्चा झाली. मुंबईतील वाढत्या पाणीटंचाईला अनधिकृत नळजोडण्या, पाणीचोरी आणि नियोजनातील त्रुटी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. मालवणी, मानखुर्द, कुर्ला, साकीनाका, गोवंडी, कलीना यांसारख्या विविध भागांतील अनधिकृत नळजोडण्या, बेकायदेशीर हॉटेल्स, गॅरेजेस आणि वाहन धुलाई केंद्रांमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी होत असल्याचा मुद्दा भाजप आमदार राजहंस सिंह यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात मांडला. यावर सकारात्मक उत्तर देत, पुढील ९० दिवसांत मुंबई शहरात विशेष मोहीम राबवून सर्व अनधिकृत नळजोडण्या शोधून त्या तात्काळ तोडण्याचे आदेश दिले जातील, अशी स्पष्ट ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.
Devendra Fadnavis : लवकर पूर्ण होतील अशी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीची मोहीम राबवा
मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये 'एल निनो'बाबत दिलेल्या इशाऱ्यांबाबत ...
सभागृहात अधिक माहिती देताना आमदार राजहंस सिंह म्हणाले की, मुंबईला दररोज सुमारे ४,६६५ एमएलडी (
ग्रामपंचायत संगणक परिचालकांना किमान २० हजार मानधन द्या; आमदार बच्चू कडूंची मागणी
शासन स्तरावर लवकरच संयुक्त बैठक घेणार: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणात आणि डिजिटल सेवा ...
Labour Minister Adv. Akash Fundkar : माथाडी कामगारांच्या समस्यांवर समन्वयाने तोडगा काढावा
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश
महिंद्रा लॉजिस्टिक्समधील कामगारांच्या मागण्यांबाबत बैठक
मुंबई : मे. महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, चाकण ...
भाजप आमदार राजहंस सिंह यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, मुंबईच्या भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन शासन विविध स्तरांवर काम करत आहे. यासाठी गारगाई धरण प्रकल्प (440 MLD), मालाड-मनोरी आणि अंधेरी-वर्सोवा येथील डिसॅलिनेशन (Converting seawater into fresh water) प्रकल्प, तसेच दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. प्रशासनाने केलेल्या आतापर्यंतच्या कारवाईची माहिती देताना मंत्र्यांनी सांगितले की, जानेवारी २०२६ ते जून २०२६ या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत २,२५७ अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत. तसेच मालवणी, मानखुर्द, साकीनाका, कुर्ला या भागांतील ४७ गॅरेजेसचा बेकायदेशीर पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र, सदस्यांनी व्यक्त केलेली चिंता लक्षात घेता, यापुढे अधिकाधिक कडक पावले उचलली जातील आणि ९० दिवसांत विशेष मोहीम राबवून ही कारवाई पूर्ण केली जाईल.
ग्रामपंचायत संगणक परिचालकांना किमान २० हजार मानधन द्या; आमदार बच्चू कडूंची मागणी
शासन स्तरावर लवकरच संयुक्त बैठक घेणार: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणात आणि डिजिटल सेवा ...