महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार पाऊस पडला. मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाच्या सरी पुन्हा मंदावल्या. यंदा पावसाचं आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चितेंच वातावरण आहे. प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मान्सूनने गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा हैरान करून सोडलं आहे. अशातच हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.राज्यात 2 जुलैपासून मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder) यांच्या मृत्यू प्रकरणात तपासादरम्यान ...
अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. आतापर्यंत विदर्भात पाऊस कमी पडण्याचं प्रमाण 50 ते 60 टक्क्यांवर पोहोचल्याचं प्रादेशिक हवामान विभागाने एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे. अल निनोमुळे जून महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण घटले आहे. जूनमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
John Abraham Enters in Cricket : अभिनेता शाहरुख खान तसेच अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या दुनियेत मोठं पाऊल ...
२ जुलै नंतर धो धो पाऊस राज्यात 2 जुलैपासून धो धो पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.या दिवसापासून राज्यभरात नियमित आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणे अपेक्षित असते. परंतु,'अल निनो'चा प्रभाव असल्याने राज्यातल्या अनेक भागात पाऊस कमी झालास, अशी माहिती प्रादेशिक हवामान खात्याच्या रिसर्चमध्ये समोर आली आहे.राज्यात 2 जुलैपासून मुसळधार पाऊस सर्वदूर नियमित होईल. असेही प्रादेशिक हवामान खात्याचे म्हणणे आहे.





