गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. छत्तीसगडहून कुरखेडाकडे येणाऱ्या मालवाहक ट्रकचा ब्रेक निकामी झाला. यामुळे अनियंत्रित झालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या महिंद्रा XUV300 ला जोरात धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की मागून येत असलेल्या टाटा पंच कारलाही फटका बसला. अपघातात ट्रक, महिंद्रा XUV300 आणि टाटा पंच अशा तीन वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात जीवितहानी झालेली नाही.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सुर्वे नगर परिसरात एका बंद घरात झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली ...
घाटात चढणावर एक ट्रक बंद पडल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता. या ट्रकला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने प्रवास करताना ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकने समोरून येणाऱ्या महिंद्रा XUV300 ला धडक दिली. या अपघातात महिंद्रा XUV300 दोन ट्रकच्या मध्ये अडकली. XUV300 चा अपघातात चुराडा झाला. ट्रकची धडक एवढी जोदार होती की XUV300 भेलकांडली आणि जवळून जात असलेल्या टाटा पंचचेही नुकसान झाले. स्थानिकांनी तातडीने मदत केली आणि अपघातामुळे नुकसान झालेल्या वाहनांतून प्रवास करणाऱ्यांना सुखरुप बाहेर काढले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून पुढील दोन महिन्यांत अल निनोचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी ...
अपघातात टाटा पंचमधील माणिक कवडू मेश्राम (५७) या उदापूर, ब्रह्मपुरी येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सात टाके पडले. सध्या माणिक कवडू मेश्राम यांच्यावर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई : राज्यात ॲनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या विक्री, साठवण आणि वापरावर पुढील एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत ...
अपघातानंतर ट्रकमधील लोखंडी सळ्या रस्त्यावर विखुरल्या, डिझेलची टाकी फुटली आणि डिझेल रस्त्यावर सांडले. पण स्थानिकांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्याने काही तासांत परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आणली आहे. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात प्रकरणी नियमानुसार पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.






