मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची धक्कादायक घटना घडली. एका मेट्रो शॉपच्या (Metro Shop) जवळ पाईपला आग लागल्याने परिसरात घबराट पसरली होती. या आगीच्या ज्वाळा वीजेच्या खांबापर्यंत पोहोचण्याचा धोका असल्याने अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट डेनाली हे ६,१९० मीटर उंचीचे शिखर ...
लोकमान्य टिळक रोडवरील घटना
मुंबईच्या दादर परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने नागरिकांमध्ये घबराट पसरवली होती. लोकमान्य टिळक रोडवर असलेल्या एका मेट्रो शॉपच्या जवळ असलेल्या पाईपला अचानक भीषण आग लागली. 'dadarmumbaikar' या इंस्टाग्राम पेजवरून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात आगीच्या उंच ज्वाळा आणि आकाशात पसरलेले धुराचे काळे लोट स्पष्टपणे दिसत आहेत. या पाईपच्या अगदी जवळच एक वीजेचा खांब (Electric Pole) असल्यामुळे आग अधिक पसरण्याची आणि मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
View this post on Instagram
अग्निशमन दलाची तत्पर कारवाई आणि स्थानिकांची धावपळ
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अत्यंत तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, जेणेकरून ही आग आसपासच्या दुकानांपर्यंत आणि परिसरातील इमारतींपर्यंत पोहोचू नये. आगीची तीव्रता पाहून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने रिकामी केली होती. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही.





