सरकारी तेल कंपन्यांनी 6 ऑगस्टसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू असले तरी देशातील बहुतांश शहरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना आजही पूर्वीच्या दरानेच पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. ( Petrol Diesel Rate)
देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये हैदराबादमध्ये सर्वाधिक किंमत कायम आहे. येथे पेट्रोलचा दर 115.69 रुपये प्रति लिटर आहे. त्यानंतर कोलकात्यात 113.43 रुपये, मुंबईत 111.12 रुपये, बंगळुरूमध्ये 110.93 रुपये, चेन्नईमध्ये 107.75 रुपये आणि दिल्लीत 102.12 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल उपलब्ध आहे. (Crude Oil )
डिझेलच्या दरांवर नजर टाकली तर हैदराबादमध्ये प्रति लिटर 103.82 रुपये दर असून तो सर्वाधिक आहे. चेन्नईमध्ये डिझेल 99.57 रुपये, कोलकात्यात 99.78 रुपये, बंगळुरूमध्ये 98.79 रुपये, मुंबईत 97.78 रुपये आणि दिल्लीत 95.20 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन
भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर (सुमारे ३.९९ लाख कोटी रुपये) गोळा करण्याची ...
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 79.31 डॉलर प्रति बॅरलवर असून त्यात किरकोळ घसरण झाली आहे. तसेच अमेरिकन डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत 74.96 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.
जागतिक स्तरावर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतुकीबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे तेल बाजारावर लक्ष ठेवले जात आहे. या मार्गातील कोणताही बदल किंवा अडथळा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम जागतिक तेलपुरवठ्यावर होऊ शकतो.
भारत आपल्या गरजेपैकी 85 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्यास देशाच्या आयात खर्चात वाढ होण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम महागाईवर तसेच भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही होऊ शकतो.