Friday, June 26, 2026

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

Ketan Agarwal Murder Case:

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर

Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder) यांच्या मृत्यू प्रकरणात तपासादरम्यान नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिने पोलिसांच्या चौकशीत काही महत्त्वाची माहिती दिल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांकडून तिच्या जबाबाची पडताळणी केली जात असून या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचे लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा विवाह निश्चित झाला होता. मात्र, सियाला हे लग्न मान्य नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. तिचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. याच कारणातून पुढे वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

तपासादरम्यान पोलिसांना असेही आढळले की, घटनेपूर्वी आरोपींनी एकापेक्षा अधिक वेळा योजना आखल्याचा संशय आहे. अखेर सियाने वाढदिवसाच्या निमित्ताने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले. त्यानंतर घडलेल्या घटनेत केतनचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पुढील तपासात पोलिसांना संशय आल्याने तपासाची दिशा बदलली.

सियाच्या उत्तराने पोलीस चक्रावले 

 

चौकशीदरम्यान सियाने केतनबाबत वैयक्तिक नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. केतन तोतरे बोलत होता आणि डोक्यावर विग वापरत असल्यामुळे तो आपल्याला पसंत नव्हता, असे तिने पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे. तसेच चेतन चौधरीनेच केतनला संपवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचाही दावा तिने केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुलाला केसांचा पॅच असल्याची माहिती लग्न ठरण्यापूर्वीच सियाच्या कुटुंबाला दिली होती, असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींचे जबाब, कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि इतर माहितीची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >