Pune Crime : पुणे: पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे एका स्टील व्यावसायिकाच्या गोडाऊनवर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. उशिरा रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Pune)
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात तरुणांनी स्टील व्यावसायिकाच्या गोडाऊनवर येऊन गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोडाऊन आणि कार्यालय परिसरात गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. (Fursungi News)
होणाऱ्या बायकोचा 'खतरनाक' डाव! बड्या बापाच्या मुलाला ढकललं दरीत पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) ...
या प्रकरणाला वेगळे वळण देणारी बाब म्हणजे गोळीबारानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये काही व्यक्तींनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधित व्यावसायिक आणि त्याच्या भागीदारांकडे अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख करण्यात आला असून त्यानंतर हा मार्ग स्वीकारल्याचे म्हटले आहे. पोस्टमध्ये पुढील काळात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत.
तपासादरम्यान संबंधित व्यावसायिक आणि त्याच्या भागीदारांकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या आर्थिक व्यवहाराचा आणि धमक्यांचा तपास सुरू आहे. (Pune Gang Threat News)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा ...
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र या पोस्टचा आणि गोळीबाराचा प्रत्यक्ष संबंध आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. हा प्रकार खंडणी, व्यावसायिक वाद किंवा इतर कोणत्या कारणातून घडला, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





