Sunday, August 23, 2026

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून गुजरातमधील वडोदरा विभागातील वर्णमा येथील कॉनकॉरच्या GCT टर्मिनलपर्यंत पहिली

"> ‘डबल-स्टॅक लाँग-हॉल’ कंटेनर ट्रेन यशस्वीपणे चालवण्यात आली. या ट्रेनने एकाच फेरीत तब्बल ३६० TEU कंटेनर्सची वाहतूक करत सुमारे ४२२ किलोमीटरचे अंतर पार केले. (Indian Railway)

या लाँग-हॉल ट्रेनमध्ये प्रत्येकी ४५ वॅगन्स असलेले दोन डबल-स्टॅक रेक्स जोडण्यात आले होते. पुढील रेकचे वजन १,८१७ टन असून त्यासाठी लोको क्रमांक ६०३११, तर मागील रेकचे वजन २,१०५ टन असून त्यासाठी लोको क्रमांक २४६९० वापरण्यात आले.

या प्रयोगामुळे एका ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात कंटेनर्सची वाहतूक करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. त्यामुळे बंदरे आणि मालवाहतूक टर्मिनल्सवरील गर्दी कमी होण्यासोबतच कंटेनर्सचा मुक्काम कालावधी कमी होऊन मालाची जलद वाहतूक होण्यास मदत होणार आहे. (Indian Railway)

वेळ आणि खर्चात बचत

एकाच फेरीत अधिक कंटेनर्सची वाहतूक झाल्याने लोकोमोटिव्ह आणि कंटेनर फ्लॅट वॅगन्सची गरज कमी होईल. तसेच समान प्रमाणातील माल वाहून नेण्यासाठी लागणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्याही कमी होतील. परिणामी, रेल्वे मार्गाच्या उपलब्ध क्षमतेचा अधिक कार्यक्षम वापर होऊन मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. (Indian Railway)

पर्यावरणपूरक मालवाहतुकीला चालना

ही सेवा शाश्वत आणि पर्यावरणपूरक मालवाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. ही ट्रेन पूर्णपणे विजेवर धावणार असल्याने रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. एका डबल-स्टॅक लाँग-हॉल ट्रेनमधून मोठ्या संख्येने ट्रकच्या बरोबरीचा माल वाहून नेता येत असल्याने डिझेलचा वापर, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्याची शक्यता आहे.

या यशस्वी प्रयोगामुळे देशातील रेल्वे मालवाहतुकीची क्षमता वाढवण्यास तसेच बंदरे आणि अंतर्गत मालवाहतूक टर्मिनल्सदरम्यान जलद व कार्यक्षम कंटेनर वाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. (Indian Railway)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >