Wednesday, June 17, 2026

Ind vs Afg : भारताने अफगाणिस्तान विरूद्धची वन डे सीरिज २-० अशी जिंकली, दुसऱ्या मॅचमध्ये मोठ्या फरकाने बाजी मारली

Ind vs Afg : भारताने अफगाणिस्तान विरूद्धची वन डे सीरिज २-० अशी जिंकली, दुसऱ्या मॅचमध्ये मोठ्या फरकाने बाजी मारली

लखनऊ : भारताने अफगाणिस्तान विरूद्धची वन डे सीरिज २-० अशी जिंकली. पहिली वन डे सात विकेट्स राखून आणि दुसरी वन डे १७० जिंकण्याची किमया भारताने साधली. याआधी भारताने अफगाणिस्तान विरूद्धची एकमेव टेस्ट मॅच एक डाव आणि ३०० धावांनी सहज जिंकली.

भारताने ५० षटकांत ४०३ धावा करण्याचे कठीण आव्हान अफगाणिस्तानपुढे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पूर्ण संघ २३२ धावा करू शकला. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने सर्वाधिक ७९ धावा केल्या. सेदिकुल्लाह अटलने ४२, रहमानुल्लाह गुरबाजने ४१, इब्राहिम झाद्रानने २१, रशीद खानने १२ धावांचे योगदान दिले. इतर खेळाडू झटपट परतले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रारने प्रत्येकी तीन तर राजकुमार यादवने दोन विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.

भारताने उभारला धावांचा डोंगर

लखनऊ येथे झालेल्या वन डे मध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ही अफगाणिस्तानसाठी घोडचूक ठरली. भारताने ४९.५ षटकांत सर्वबाद ४०२ धावा केल्या. भारताकडून शुभम गिलने १५४, ईशान किशनने १२५, रोहित शर्माने ४८, श्रेयस अय्यरने २६, वॉशिंग्टन सुंदरने १९ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून नांगेयालिया खरोटीने ४ तर रशीद खानने ३ विकेट घेतल्या. एएम घझनफर आणि मोहम्मद सलीम साफीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

तिसरी वन डे चेन्नईत होणार

भारत - अफगाणिस्तान यांच्यातील तिसरी वन डे चेन्नईत होणार आहे. ही मॅच जिंकून सीरिज ३-० अशी खिशात टाकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >