डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्धचा कसोटी सामना बांगलादेशने नऊ विकेट राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच हरवण्याची किमया बांगलादेशने साधली. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला बांगलादेशचा हा दुसरा विजय आहे.
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. मात्र, सामन्याच्या ...
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणे ऑस्ट्रेलियाला भोवले, त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद १९८ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद २८४ धावा केल्या तर बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद ४२६ आणि निर्णायक डावात एक बाद ५७ धावा करून विजय मिळवला. सुरुवातीलाच घेतलेल्या २८८ धावांच्या आघाडीच्या जोरावर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना सहज जिंकला.
गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार आहे. याआधी शनिवारी कसोटीच्या पहिल्या ...
बांगलादेशकडून हसन महमूदने पहिल्या डावात १७ षटकांत ५५ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना बाद केले. त्याने दुसऱ्या डावात १९ षटकांत ५६ धावा देत ३ जणांना बाद केले. दोन्ही डावात मिळून नऊ फलंदाजांना बाद करणारा हसन महमूद सामनावीर झाला.
कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर ...
पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये आणि ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात चौथे स्थान कायम राखले आहे. पण बांगलादेशच्या विजयाची टक्केवारी ६६.६७ वर पोहोचली आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या (विजयाची टक्केवारी ७७.७८), दक्षिण आफ्रिका दुसऱ्या (विजयाची टक्केवारी ७५), न्यूझीलड तिसऱ्या (विजयाची टक्केवारी ७२.२२), बांगलादेश चौथ्या (विजयाची टक्केवारी ६६.६७) आणि भारत पाचव्या (विजयाची टक्केवारी ४८.१५) स्थानावर आहे.



