मुंबई : मुंबईकरांना यंदा मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारणपणे ७ ते ८ जूनदरम्यान मुंबईत दाखल होणारा मान्सून १५ जून उलटल्यानंतरही शहरापासून दूरच आहे. त्यामुळे उष्णता, वाढलेली आर्द्रता आणि पाणीटंचाईच्या संभाव्य संकटामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)
दरम्यान, पावसाच्या अनुपस्थितीमुळे मुंबईतील उकाडा कायम आहे. सोमवारी सांताक्रूझ येथे ३५.२ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.१ आणि ३.५ अंशांनी अधिक होते. किमान तापमानात काहीशी घट झाली असली तरी हवेतील ६० ते ७० टक्के आर्द्रतेमुळे नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारीही हवामानात विशेष बदल होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)
भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत खेळत असताना ...
मान्सूनच्या उशिरामुळे आता मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबतही चिंता वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा हळूहळू कमी होत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास ही कपात वाढवून २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)
पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. शहरात ...





