Sunday, August 16, 2026

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या चालकाने हातात लाकडी काठी घेतली आणि ५० वर्षांच्या व्यक्तीच्या डोक्यात जोरात मारली. या घटनेत ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. जखमी व्यक्ती रेमंड लिमिटेडमध्ये व्यवस्थापक अर्थात मॅनेजर या पदावर कार्यरत असल्याचे समजते.

ईस्टर्न एक्सप्रेस वे वर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात एफआयआर नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या सचिन धुमाळ या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एफआयआरची नोंद केली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, ते प्रभादेवीतील आगर बाजार भागातून वोक्सवॅगन टायगुनमधून ठाण्यात कामावर जात होते. त्यांची कार रमाबाई आंबेडकर नगर येथील पुलाजवळून जात होती. धुमाळ कारमध्ये होते. त्याचवेळी ३५ वर्षीय पिकअप चालक राकेशकुमार श्रीवास्तव मागून त्याचे वाहन घेऊन आला. तो सतत हॉर्व वाजवत होता. वाहतूक कोंडीमुळे धुमाळ हळू गाडी चालवत होते आणि त्यांना रस्ता देणे शक्य झाले नाही. हायवे फॅसिलिटेशन सेंटरजवळ स्वतःची कार थोडी बाजूला घेताच मागून येत असलेल्या पिकअपच्या वाहनाने वेगाने ओव्हरटेक केले. पण ओव्हरटेक करताना या वाहनाने तक्रारदाराच्या कारला धडक दिली आणि पिकअप गाडी पुढे आणून थांबवली.

पिकअपने दिलेल्या धडकेनंतर धुमाळ यांच्या गाडीच्या डाव्या बाजूचा आरसा खराब झाला. यावरून तक्रारदार आणि राकेशकुमार श्रीवास्तव यांच्यात वाद झाला. वाद वाढला आणि श्रीनिवासने लाकडी काठी घेऊन धुमाळ यांना डोक्यात जोराने मारली. काठीचा मार जोरात लागल्यामुळे धुमाळ लगेच रस्त्यावर कोसळले. पण धुमाळ यांनी स्वतःला सावरत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पंतनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पिकअप चालक राकेशकुमार श्रीवास्तव याला ताब्यात घेतले. जखमी धुमाळ यांना राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले. धुमाळ यांचा जबाब घेऊन अखेर पोलिसांनी एफआयआरची नोंद केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >