Saturday, August 15, 2026

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल कॉलेजजवळ एका ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भाषण अपघात घडला. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. (Wardha Accident)

अपघात घडला कसा ?

मिळालेल्या माहितीच्या आधारे, या तीन मुली स्वतंत्रदिनानिमित्त दुचाकीवरून सहज फेरफटका मारण्याकरिता निघाल्या होत्या. हिंगणघाट शहरातील मेडिकल कॉलेजजवळून जात असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही मुली ट्रॅव्हल्सखाली चिरडल्या गेल्या. अपघातानंतर स्थानिकांनी तिन्ही मुलींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पासून तिघीही मृत असल्याचे घोषित केले. (Wardha Accident)

या भीषण अपघातात प्राण गमावलेल्या तिन्ही मुली अल्पवयीन आहेत. समृद्धी रुपक धामसे (वय १५ वर्षे, रा. संत गोमाजी वॉर्ड), आरुही राजू चवरे (वय १७ वर्षे) आणि मिसबा जावेद शेख (वय १७ वर्षे, रा. संत चोखोबा वॉर्ड) अशी या मुलींची नावे आहेत. (Wardha Accident)

स्वातंत्रदिनी घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे समस्त हिंगणघाट परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले असून पुढे या घटनेची पुरेपूर तपासणी करण्यात येईल.(Wardha Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >