पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. शहरात सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून नव्या दरवाढीनंतर वाहनधारकांच्या खर्चात भर पडणार आहे. (CNG Price Hike)
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सीएनजीच्या दरात २.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीतच पुन्हा १ रुपयांची वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सततच्या दरवाढीमुळे दैनंदिन प्रवासाचा खर्च वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. (CNG Price Hike)
अमरावती : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेते पटल्या गुरुजी मावस्कर (Former BJP MLA Patlya Guruji) यांचे सोमवारी ...
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती यामुळे इंधनाच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऊर्जा क्षेत्रावर परिणाम झाला असून त्याचे पडसाद देशांतर्गत इंधन दरांवरही उमटत आहेत. (CNG Price Hike)
मुंबईत शुन्य जीवितहानी उद्दीत ठेवा मुंबई महापालिकेसह सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) यंदा पाऊस ...
मात्र, पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या शक्यता व्यक्त होत असतानाच सीएनजीच्या दरवाढीने पुणेकरांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. आता आगामी काळात इंधनाच्या दरांमध्ये नेमके काय बदल होतात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. (CNG Price Hike)





