अमेरिकेच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. कॅलिफोर्नियातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसवरून नियमित चाचणी मोहिमेसाठी उड्डाण केलेले B-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस बॉम्बर विमान (American B-52 Bomber Crash) सोमवारी उड्डाणानंतर काही मिनिटांत कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून हवाई दलाने या अपघातातून "बचाव अशक्य" असल्याचे म्हटले आहे. (American B-52 Bomber Crash)
अपघातानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ही मोहीम आता 'रिकव्हरी ऑपरेशन'मध्ये बदलण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना कर्नल जेम्स हेस यांनी, "हा अत्यंत दुर्दैवी आणि जीवघेणा अपघात होता," असे सांगितले. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये लष्करी अधिकारी, सरकारी कर्मचारी आणि सरकारी कंत्राटदारांचा समावेश आहे. विमान उत्पादक कंपनी बोईंगनेही आपल्या दोन कर्मचाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मदत केली जात असल्याचे म्हटले आहे. (American B-52 Bomber Crash)
वॉशिंग्टन / तेहरान : गेल्या अनेक महिन्यांपासून पश्चिम आशियात (मध्यपूर्व) धगधगणाऱ्या युद्ध आणि लष्करी तणावाला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. अमेरिका आणि ...
अपघातानंतर एअर फोर्स बेसवरील धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. सर्व येणारी विमाने इतर विमानतळांकडे वळवण्यात आली. तसेच सर्व गैर-व्यावसायिक भेटीगाठींवर बंदी घालण्यात आली होती. नंतर बेस पुन्हा सुरू करण्यात आला असला तरी मंगळवारपर्यंत सर्व नियमित कामकाज स्थगित ठेवण्यात आले आहे. (American B-52 Bomber Crash)
पश्चिम आशियाला गेल्या १०७ दिवसांपासून हादरवून सोडणाऱ्या अमेरिका आणि इराणमधील युद्धाला अखेर पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने मोठी घडामोड झाली आहे. ...
या अपघातग्रस्त विमानाचा वापर रडार आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या चाचण्यांसाठी केला जात होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून लष्करी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. मात्र संपूर्ण तपास अहवाल सार्वजनिक होण्यासाठी सुमारे सहा महिने लागू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे १९८२ नंतर B-52 बॉम्बरशी संबंधित झालेला हा सर्वात भीषण अपघात मानला जात आहे. १९८२ मध्ये कॅलिफोर्नियातील मॅथर एअर फोर्स बेस येथे झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. (American B-52 Bomber Crash)
View this post on Instagram




