मुंबई : राज्यात १५ जूनपासून दमदार पावसाची अपेक्षा असताना मॉन्सूनने (Maharashtra Monsoon Weather Alert) पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा केली आहे. अरबी समुद्रातील मॉन्सूनची वाटचाल सध्या ठप्प झाली असून, अफगाणिस्तानच्या दिशेने निर्माण झालेल्या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनच्या पुढील प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी आता २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
दरम्यान, यंदा एल निनोचा प्रभावही राज्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागानेही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत सूचना मिळेपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संभाव्य नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)
बर्मिंगहॅम : अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने ...
सध्या मॉन्सूनने पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागात प्रगती केली असली तरी अरबी समुद्रात गेल्या आठ दिवसांपासून कोणतीही विशेष हालचाल दिसून आलेली नाही. पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून पुन्हा वेग घेण्याची शक्यता असून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये त्याचा प्रभाव वाढू शकतो. (Maharashtra Monsoon Weather Alert)






