मुंबई : स्टँडअप कॉमेडियन (Stand-up Comedian) प्रणित मोरे (Pranit More) याच्या शोमधील (Show) काही वादग्रस्त आणि आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स (Viral Video Clips) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः ‘३७० रुपयांची बिर्याणी’ (370 Rupees Biryani) आणि एका डॉक्टर तरुणीने मृतदेहाच्या खासगी अवयवांबाबत (Private Parts) केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देत अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of Expression) आणि सामाजिक मर्यादा (Social Limits) यांच्यात समतोल राखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी आयर्लंड दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहेत. भारत आणि आयर्लंड यांच्यात 26 आणि 28 जून रोजी दोन टी-20 सामने ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारतीय संविधानाने (Indian Constitution) प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. स्टँडअप कॉमेडियननाही (Stand-up Comedians) तो अधिकार आहे. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होऊ नये. समाजातील इतरांच्या प्रतिष्ठेने जगण्याच्या अधिकारावर (Right to Dignity) कुणीही अतिक्रमण करू नये." ते पुढे म्हणाले की, "मी स्वतः स्टँडअप कॉमेडी पाहतो. हे एक मनोरंजनाचे साधन (Entertainment Medium) आहे. मात्र विनोद करताना मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत."
दरम्यान, या वादग्रस्त कंटेंट (Controversial Content) प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने (Maharashtra Cyber Cell) कारवाई सुरू केली आहे. कथित आक्षेपार्ह वक्तव्ये (Objectionable Remarks) सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर (Online Platforms) प्रसारित केल्याप्रकरणी प्रणित मोरे, हिमांशू जांगरा (Himanshu Jangra) आणि डॉ. सेजल पवार (Dr. Sejal Pawar) यांच्यासह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. हरसूल पोलिस ठाण्याच्या (Harsul Police Station) हद्दीतील एका १६ वर्षीय आदिवासी अल्पवयीन ...
सायबर तपासादरम्यान (Cyber Investigation) काही व्हिडीओ क्लिप्समध्ये महिलांविषयी अवमानकारक वक्तव्ये आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी (Inquiry) आणि जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत.






