मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या 'क्राईम पेट्रोल' या सुप्रसिद्ध कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहे. या मालिकेचा प्रीमियर ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. 'क्राईम पेट्रोल २०२६ - क्राईम का करंट सीझन' हा कार्यक्रम सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर रात्री १०.३० वाजता प्रसारित होईल. त्याचबरोबर याचे लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा सोनी लिव्ह केले जाईल.
मुंबई : श्रावण महिना सुरू होताच सोने - चांदी खरेदीदारांची रेलचेल वाढू लागते. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा ...
सिंघम, रेड, दृश्यम यांसारख्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता, आता सूत्रसंचालक म्हणूनही तितकाच दमदार असणार का? याकडे सर्वांचंच लक्ष्य लागलंय. एका निवेदनात अजय देवगणने म्हटले आहे की, 'क्राईम पेट्रोल' सारख्या शोमध्ये सामील होणे ही त्याची चाहत्यांप्रति आणि प्रेक्षकांप्रति असलेली जबाबदारी आहे. 'क्राईम पेट्रोल २०२६ - क्राईम का करंट सीझन' या नव्या पर्वाचा प्रोमोदेखील अत्यंत रंजक आहे. प्रोमोत अजयने प्रेक्षकांना आपल्या विशेष अंदाजात गुन्हेगारीपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
"क्राईम पेट्रोल" चा पहिला भाग २००३ मध्ये प्रसारित झाला. पुढे "क्राईम पेट्रोल सतर्क", "क्राईम पेट्रोल दस्तक", "क्राईम पेट्रोल डायल १००" आणि "क्राईम पेट्रोल २.०" यांसारख्या अनेक आवृत्त्यांमधून तो आणखी प्रसिद्ध होत गेला. या मालिकेचं सूत्रसंचालन आजवर अनेक सुप्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्रींनीं केलं आहे. गेल्या अनेक वर्षांत अनुप सोनी, साक्षी तंवर, सोनाली कुलकर्णी, दिव्यांका त्रिपाठी, आशुतोष राणा, रेणुका शहाणे आणि नकुल मेहता यांनी अतिशय रंजकपणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.






