Monday, August 10, 2026

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सलमान खानसोबतच्या एका खास प्रसंगाचा खुलासा केला. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पार्टनर’ चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी सलमान खान कठीण काळातून जात होता. त्यावेळी गोविंदाने त्याला स्वतःवर काम करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले. (Bollywood)

गोविंदाने एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यावेळी त्याने सलमानला नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला होता. 'तू अभिनेता आहेस पण दिसत नाही' असं देखील त्यांनी सलमानने सांगितले होते. सलमानकडे अभिनेता म्हणून आवश्यक असलेले अनेक गुण आहेत आणि त्याने स्वतःवर लक्ष केंद्रित केल्यास तो मोठे यश मिळवू शकतो, असे गोविंदाने त्याला सांगितले होते. विशेष म्हणजे, सलमान पुढील 10 वर्षे बॉलिवूडवर राज्य करेल, असेही गोविंदाने त्यावेळी म्हटले होते. (Salman Khan And Govinda)

याच मुलाखतीत गोविंदाने स्वतःच्या वाढलेल्या वजनाबाबतही भाष्य केले. त्यावेळी त्याचे वजन तब्बल 114 किलो झाले होते. राजकारणातून बाहेर पडल्यानंतर त्याला आपल्या वजनाची चिंता सतावत होती. वजन कमी झाले नाही तर आपल्याला मुख्य भूमिकांऐवजी केवळ कॅरेक्टर आर्टिस्टच्या भूमिका मिळतील, अशी भीती त्याला वाटत होती. ‘पार्टनर’मध्ये तो विनोदी भूमिका करत होता आणि त्याच्या कारकिर्दीबाबतही तो विचार करत होता. (Entertainment news)

गोविंदाच्या म्हणण्यानुसार, त्याने सलमानला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. दिवसातून 2 ते 3 तास व्यायाम करण्याचा सल्लाही त्याने दिला. धर्मेंद्र यांचे उदाहरण देत सलमानमध्ये हिरो म्हणून मोठी क्षमता असल्याचे गोविंदाने त्याला पटवून दिले.

गोविंदाने सांगितले की, सलमानने त्याचा सल्ला गांभीर्याने घेतला आणि त्यानंतर स्वतःमध्ये बदल घडवून आणले. पुढील काळात सलमानला मोठे यश मिळाले. आपण सलमानला जे सांगितले होते, ते त्याने प्रत्यक्षात करून दाखवले, असे गोविंदाने या मुलाखतीत नमूद केले.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >