Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. हरसूल पोलिस ठाण्याच्या (Harsul Police Station) हद्दीतील एका १६ वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार याठिकाणी उघड झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत १० संशयितांना अटक केली आहे.
छ. संभाजीनगर : बाप हा कितीही कठोर असला तरी त्यांच बोलणं त्यांचा ओरडणं कधी कधी त्याच मारणं हे सर्व मुलांच्या काळजी पोटीच असतं. मात्र याच वडिलांच्या ...
नेमकं प्रकरण काय ?
हरसूल परिसरातील आदिवासी गावातील अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. मुलीला आई नव्हती. आपली मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. पण मुलगी काही सापडली नाही. अखेर हरसूल पोलिस ठाण्यात (Harsul Police Station) मुलीच्या वडलांनी धाव घेत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान परिसरातील कोणताही तरुण बेपत्ता नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आणि एक मोठे रॅकेट समोर आले.
नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र ...
मोबाईलचे आमिष, दोन लाखांत सौदा
तपासात उघड झाले की, आरोपींनी मोबाईल फोनचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेले. त्यानंतर तिला संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर (Kauthe Malkapur) येथे नेऊन अल्पवयीन असतानाच जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला. कौठे मलकापूर गावात तुषार पाटीलबा पचपिंड (वय २९) या तरुणाशी तिचा लावून दिला.
धक्कादायक बाब म्हणजे या मुलीसाठी दोन लाख रुपयांचा सौदा करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. काही रक्कम रोख, तर काही ‘फोन पे’द्वारे व्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात काही आरोपींनी मुलीला पळवून नेणे, काहींनी दलाली करणे, तर काहींनी तिला लपवून ठेवण्याचे काम केल्याचे तपासात उघड झाले आहे.
Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलिस दलात प्रभारी अधिकार्यांच्या बदल्यांची चर्चा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रंगली होती. अखेर पोलिस अधीक्षक ...
१० संशयित जेरबंद
संशयितांमध्ये तुषार पाटीलबा पचपिंड (वय २९), संदीप पचपिंड (४०), विशाल परचंडे (३३), महादेव साहेबराव नाईकवाडे (चौघे रा. कौठे मलकापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), सुरेश नवसू फसाळे (४६), कमल सुरेश फसाळे (३५), धर्मा नवसू फसाळे (४०, तिघे रा. गंगाम्हाळुंगी, ता. जि. नाशिक), सीता पुंडलिक बेंडकोळी (३८, रा. वेळे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), ठकूबाई लक्ष्मण माळेकर (६०, रा. सारस्ते, ता. पेठ, जि. नाशिक), सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे (४५, रा. सहाणे मळा, मु. पो. वरवंडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कारवाई करत संपूर्ण टोळीला जेरबंद केले आहे. दरम्यान, या टोळीमार्फत आणखी किती मुलींची विक्री झाली आहे का? याचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आदिवासी भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






