मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका मुख्यालय इमारतीची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची सूचना सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे. मंत्रालय डिजी प्रवेश यंत्रणेच्या धर्तीवर महानगरपालिका मुख्यालयामध्येदेखील अशा प्रकारची आधुनिक यंत्रणा बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की म्हटले आहे कि, मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेली महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालतो व मुंबईशी निगडीत असलेल्या समस्या मांडण्यासाठी या मुख्यालयात दररोज हजारो नागरिक, मान्यवर व्यक्ति, नगरसेवक व लोक प्रतिनिधी येत असतात.या प्रवेशद्वाराच्या सुरक्षेबाबत मी पुन्हा एकदा आपले लक्ष वेधू इच्छितो. प्रवेशद्वारावरती प्रवेश करत असताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी मंत्रालयाच्या डिजी प्रवेश यंत्रणेच्या धर्तीवर महानगरपालिका मुख्यालयामध्येदेखील अशा प्रकारची आधुनिक यंत्रणा बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले आहे..
महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही- महापौर मुंबई : मुंबईच्या महापौर रितू ...
मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर २६.११.२००८ सारखी घटना सुध्दा घडली आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रवेशद्वाराची सुरक्षा व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.





