Wednesday, June 10, 2026

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ;

महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही- महापौर

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे कार्यालय आणि त्यांचे वाहन बॉम्बने उडवून देण्याची धमकी खलिस्तानवादी संघटनेकडून मंगळवारी सकाळी मेलद्वारे तीन अतिरिक्त आयुक्तांना पाठविण्यात आल्यानंतर महापालिका मुख्यालयात खळबळ उडाली. प्रशासनाने, तत्काळ हालचाल करीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक पथकाने महापालिका मुख्यालयात कसून तपासणी केली. तसेच, पालिका मुख्यालयात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्यांच्याकडील सामानाची कडक तपासणी करण्यात आली.मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. अशा या मुंबई शहराचा कारभार ज्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातून हाकला जातो, त्या ठिकाणी मुंबई शहराच्या महापौर यांचे कार्यालय आहे. महापौर रितू तावडे यांनी महापौर होण्यापूर्वीच मुंबईतील घुसखोर बांग्लादेशी, रोहिंगे यांच्या विरोधात कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यांनी महापौर झाल्यानंतर प्रत्यक्ष फेरीवाले बांग्लादेशी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली.

त्याचप्रमाणे, वांद्रे रेल्वे स्थानकाच्या नजीक असलेल्या अनधिकृत झोपड्यांवरही महापालिकेने काही दिवसांपूर्वीच कारवाई केली होती. महापौरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, अविनाश ढाकणे आणि अभिजीत बांगर यांना खलिस्तानवादी संघटनेकडून एक इमेल पाठविण्यात आला. त्यामध्ये मुंबईच्या महापौरांचे कार्यालय आणि त्यांचे वाहन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने पालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली.त्यानंतर महापौर कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली. महापालिका मुख्यालयाच्या सातही प्रवेशद्वाराच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करून येणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात आली.तसेच तत्काळ डॉग स्कॉडद्वारे पालिका मुख्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. तसेच, पालिका सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. महापालिका मुख्यालयात कसून तपासणी केली. तसेच, पालिका मुख्यालयात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्यांच्याकडील सामानाची कडक तपासणी करण्यात आली.

अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही- महापौर

मंगळवारी १० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वीस (९:२०) च्या सुमारास मला धमकी देणारा एक ईमेल आला. या संदर्भात महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने मला तत्काळ सूचना दिल्या असे महापौर रितू तावडे यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. व्यक्तिशः मी अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही बांगलादेशी फेरीवाले आणि इतर अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा आणि मला डगमगवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही. राज्याच्या गृह खात्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ते या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून योग्य ती कडक कारवाई निश्चित करतील. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आपले काम करत आहे आणि मी माझे जनसेवेचे व्रत सुरूच ठेवेन. अशा धमक्यांमुळे मुंबईच्या विकासाचा आणि सुरक्षेचा वेग मंदावणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment