मुंबई (Marathi Actress Weight Loss Journey) : वजन कमी करणं हा मोठा टास्क (Task)सतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सातत्य. आहार, विहार, चांगली झोप यासह जर सातत्य असेल तर काहीही अशक्य नाही. मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने याच चिकाटीने तब्बल ७० किलो वजन कमी केल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्री स्वत:ला एका पॉडकास्टदरम्यान (Podcast) याबाबत माहिती दिली.
विनोदी मालिका (Serials)-नाटक आणि चित्रपटांमधून (Movies) दिसणारी आरती सोलंकी हिने तब्बल ७० किलो वजन कमी केलं आहे. आरतीने अनेक मराठी-हिंदी चित्रपटात काम केलं आहे. सध्या ती अनेक नाटकांमधूनही दिसत आहे. 'रेगे' चित्रपटातील 'शिट्टी वाजली' या गाण्यात थरकणारी आरती कुणी विसरू शकणार नाही. आरतीचं वजन तब्बल १३२ किलो होतं. मात्र काही महत्त्वाचे बदल करीत तिने चक्क ७० किलो वजन कमी केलं आहे. चाहत्यांना हा सुखद धक्का आहे, अनेकांकडून तिचं कौतुकही केलं जात आहे.
Mulshi Pattern 2 : 'मुळशी पॅटर्न २' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटिला, प्रवीण तरडेने केली घोषणा !
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या 'राजा शिवाजी'नंतर (Raja Shivaji) 'देऊळ बंद २' (Deool Band 2) या चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे. चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे चित्रपटगृहात ...
आरतीने एका पॉडकास्टदरम्यान सांगितलं की, गेल्या पाच वर्षांपासून ती प्रचंड मेहनत घेत आहे. या पाच वर्षात तिने तब्बल ७० किलो वजन कमी केलं. यासाठी गेल्या पाच वर्षांपासून ती नियमित चालण्याचा व्यायाम करते. याशिवाय सायंकाळी ६ नंतर काहीही खात नाही. त्यातही भूक लागली तर केव्हातरी पाणी पुरी किंवा सँडविज आहार घेते. तेदेखील शक्यतो टाळते. याशिवाय आरती रात्री ९ वाजता झोपते. मला काहीतरी वेगळं करून दाखवयाचं असल्याचं आरतीने या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.
आरती सोलंकी हिची आई मुस्लीम तर वडील गुजराती होते.
आरतीच्या वडिलांचं हे दुसरं लग्न होतं. वडिलांच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हतं. आरती साडे तीन वर्षांची असताना तिचे बाबा घर सोडून निघून गेले, त्यानंतर ते कधीच परतले नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा आरतीला वडिलांच्या निधनाचा फोन आला तर तिला बाबा कोण हेच आठवेना. बाबांशी कोणत्याच भावना जोडलेल्या नसल्याने अजिबात रडू आलं नसल्याचं आरतीने या पॉडकास्टमध्ये सांगितलं.