मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तिचे व्हॉट्सअॅप अकाउंटही गैरप्रकारासाठी वापरण्यात आल्याचे अभिनेत्रीने सोशल मीडियावर सांगितले. या प्रकाराची माहिती देत वनिताने आपल्या चाहत्यांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. (Vanita Kharat)
वनिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिचे एक पार्सल येणार होते. त्याचदरम्यान तिला एका व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण डिलिव्हरीशी संबंधित असल्याचे सांगत, पत्ता सापडत नसल्याचे कारण दिले. त्यासाठी व्हॉट्सअॅपवर पत्ता पाठवण्यास सांगण्यात आले. ( Online Scam)
मात्र, वनिताला या फोनचा संशय आला. तिने पार्सल बुक करताना संबंधित कंपनीकडे पत्ता आधीच दिलेला असल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार साधा डिलिव्हरी कॉल नसून फसवणुकीचा प्रयत्न असल्याचे तिच्या लक्षात आले. (Parcel Scam)
लातूर : देवणी येथील आठवडी बाजारात आईपासून दुरावलेल्या अवघ्या चार वर्षीय आरोहीचा देवणी पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोध घेऊन तिला सुखरूप वडिलांच्या ...
वनिताने सांगितले की, कुरिअर कंपनीच्या नावाचा वापर करून अशा प्रकारचे स्कॅम केले जात असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पार्सल, कुरिअर किंवा डिलिव्हरीच्या नावाने फोन किंवा मेसेज आल्यास त्याची सत्यता तपासल्याशिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये, असा सल्लाही तिने दिला. ( Cyber Crime)
तसेच संशयास्पद लिंक, मेसेज किंवा फोन आल्यास तातडीने तक्रार करावी, असे आवाहन वनिताने केले. सोशल मीडियावर मदतीच्या नावाने आलेले मेसेजही आधी तपासून घ्यावेत, असे तिने सांगितले.
या घटनेनंतर वनिताने आपले व्हॉट्सअॅप अकाउंट पुन्हा रिकव्हर केल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे तिच्या नावाने कोणाला संशयास्पद मेसेज किंवा पैशांची मागणी करणारा संदेश आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे तिने चाहत्यांना सांगितले. (Cyber Fraud)
वनिताने ही माहिती शेअर करताना ‘Scam Alert’ असा इशारा दिला असून संबंधित कुरिअर कंपनीलाही टॅग केले आहे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने कोणताही फोन किंवा मेसेज आला तरी घाईने माहिती किंवा पैसे देऊ नयेत, असे आवाहन तिने केले आहे.






