Mumbai : पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी २ हजार ५०० रिचार्ज खड्डे

भूजल पातळी वाढवण्याचा महापालिकेचा उपक्रम


मुंबई : वाढते शहरीकरण, सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे आणि भूजल पातळीत होत असलेली घट लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने भूजल पुनर्भरणासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील सिमेंट-काँक्रीट रस्त्यांच्या कडेला सुमारे २,५०० रिचार्ज खड्डे (सोख पिट्स) तयार करण्यात आले असून, त्याद्वारे पावसाचे पाणी थेट जमिनीत झिरपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.




महापालिकेच्या माहितीनुसार, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाईनच्या प्रत्येक ४०० मीटर अंतरावर हे खड्डे तयार केले जात आहेत. या खड्ड्यांमध्ये विशेष पाइप बसवण्यात आले असून, त्याभोवती खडी व गिट्टी भरली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी सहजपणे जमिनीत मुरून भूजल साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.




अधिकाऱ्यांच्या मते, मुंबईतील भूजलाचा अतिवापर आणि वाढत्या काँक्रीटीकरणामुळे नैसर्गिक जलसंचयाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या सर्वेक्षणात काही भागांत समुद्राचे खारे पाणी भूजलामध्ये झिरपल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर भूजल पुनर्भरणासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होण्याबरोबरच समुद्राच्या खाऱ्या पाण्याची जमिनीत होणारी घुसखोरी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यातील पाणीटंचाईचा धोका कमी करण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.




मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर सिमेंट-काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू असून, आतापर्यंत सुमारे १,१०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. आगामी काळात शहरातील जवळपास सर्व प्रमुख रस्त्यांवर अशाच प्रकारच्या भूजल पुनर्भरण यंत्रणा उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.
याशिवाय, शहरातील सुमारे २०० विहिरींच्या परिसरातही रिचार्ज खड्डे तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करून जमिनीखालील जलसाठा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर

मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी

BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी मुंबई

Vaccinated Stray Dogs : क्यु आर कोड पहा आणि आपला कुत्रा ओळखा

लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Crane Accident : मुंबईत मोठा अपघात! कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर क्रेन कोसळली

मुंबई : मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. एमएमआरडीएकडून सुरू

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर