Nitesh Rane : अमित शहांवर बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही

- मंत्री नितेश राणे; धमकीच्या आरोपांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा अभिजित दीपके यांना सल्ला


मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावर टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या राजकीय औकातीची मला कीव येते, अशी टीका राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी केली. अस्तित्व संपलेल्या पक्षाच्या नेत्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.


सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार गृहमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्याचा निर्णय टिळक कुटुंबाने अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतःची राजकीय पत ओळखूनच टिप्पणी करावी, असे राणे म्हणाले. जंतरमंतर येथील घटनेवरून काँग्रेस अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध करत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तेथे आवश्यक ते पाऊल उचलण्यात आले होते. काँग्रेसने त्यांच्या काळातील पेपरफुटी आणि लाठीहल्ल्यांचा इतिहास आधी पाहावा, असेही ते म्हणाले.



अभिजित दीपके यांना मिळत असलेल्या धमक्यांच्या आरोपांवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आणि राज्य सरकारची आहे. दीपके यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलण्याऐवजी पोलीस ठाण्यात जाऊन पुराव्यासह तक्रार नोंदवावी. पोलीस निश्चितच संबंधितांवर कठोर कारवाई करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.




तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच राज्य प्रगतशील


ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीबद्दल विचारले असता राणे म्हणाले की, मुंढे हे कायदे आणि शासन निर्णयांची तंतोतंत अंमलबजावणी करत आहेत. राज्यात त्यांच्यासारखे नियमाने काम करणारे असंख्य अधिकारी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अशाच शिस्तबद्ध कामाची प्रशासनाकडून अपेक्षा आहे. अशाच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे आज महाराष्ट्राला प्रगतशील राज्य म्हणून ओळख मिळाली आहे, असे सांगत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Comments
Add Comment

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर

Tehsildar Promotion : ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, तर २५ नायब तहसीलदार तहसीलदारपदी पदोन्नत

मुंबई : महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Cow Breed & Sheep Breed : महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान; उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर 'माडग्याळ' प्रजातीच्या

AI smart goggles : 'एआय स्मार्ट गॉगल्स'च्या वापराबाबत येणार निर्बंध; राज्य सरकारचे'एसओपी' तयार करण्याचे निर्देश

सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने