विनेश फोगट 'आशियाई' शर्यतीतून बाहेर!

नवी दिल्ली : भारताची ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगट हिचे २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न अखेर भंगले आहे. इंदिरा गांधी क्रीडांगण येथे शनिवारी झालेल्या महिला ५३ किलो गटाच्या निवड चाचणीतील उपांत्य फेरीत मीनाक्षीकडून ४-६ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने तिची स्पर्धेबाहेर गच्छंती झाली.निवड चाचणीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विनेशने दमदार कामगिरी करत पुनरागमनाची चिन्हे दाखवली होती. पहिल्या लढतीत तिने ज्योतीचा ७-१ अशा एकतर्फी फरकाने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत निशूवर मात करून तिने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. मात्र, निर्णायक लढतीत मीनाक्षीने चुरशीच्या संघर्षात विजय मिळवत विनेशच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आशा संपुष्टात आणल्या.

दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) यापूर्वीच विनेश फोगाटला ५३ किलो गटातील निवड चाचणीत सहभागी होण्यास मंजुरी दिली होती. नियोजित वेळापत्रकानुसार सर्व वजन गटांसाठी वजनमापन प्रक्रिया पार पडली असून विनेशसह सर्व पात्र खेळाडूंनी आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्याचे महासंघाने स्पष्ट केले.वजनमापनावेळी विनेशचे वजन ५३.९ किलो नोंदविण्यात आले आणि तिला ५३ किलो गटाच्या ड्रॉमध्ये स्थान देण्यात आले. त्यामुळे तिच्या सहभागाबाबतचा वाद काही काळासाठी तरी निवळला होता.या निवड प्रक्रियेला न्यायालयीन वादाचीही पार्श्वभूमी होती. दिल्ली उच्च न्यायालयाने २२ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार विनेशला ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. निवड प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी चाचण्यांचे चित्रिकरण करण्याचे तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या स्वतंत्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली स्पर्धा घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.



उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात भारतीय कुस्ती महासंघाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विनेशला अंतरिम दिलासा देत तिचा सहभाग कायम ठेवला आणि महासंघाच्या याचिकेवर तिचे उत्तर मागवले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जून रोजी होणार आहे. निवड चाचणीदरम्यान भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अदिती चौहान आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे एम. एम. सोमय्या हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनीही संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवले. उपांत्य फेरीतील पराभवामुळे विनेश फोगाटचा आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनरागमनाचा प्रयत्न अपयशी ठरला असला, तरी न्यायालयीन लढाई, निवड प्रक्रियेतील वाद आणि तिच्या पुनरागमनाच्या प्रयत्नांमुळे भारतीय कुस्ती विश्वात तिचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,

Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखत भारताची पुढील फेरीत वाटचाल

हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये डी गटातील अखेरचा साखळी सामना रंगला. अत्यंत

Cricket Match-Fixing : कॅनडावरील मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाईंचा राजीनामा

नवी दिल्ली : कॅनडाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १

Joe Root Test Stats : १३ धावा अन् महाविक्रम! जो रूट करणार सचिन तेंडुलकरची बरोबरी ?

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) एका ऐतिहासिक टप्प्यावर