Mantralaya Canteen : मंत्रालयातील कँटीनच्या फ्रीजपेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ!

- उच्च न्यायालयाने 'एफडीए'ला सुनावले; सरकारी उपहारगृहे आणि खासगी आस्थापनांना वेगळा न्याय लावू नका


मुंबई : मंत्रालयातील उपाहारगृहातील फ्रीजपेक्षा चपलांचा स्टँड अधिक स्वच्छ असतो, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) कानउघाडणी केली. एफडीए हे सरकारी कँटीन आणि खासगी आस्थापनांना वेगळा न्याय लावून दुजाभाव करू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने निष्पक्ष कारवाई करण्याचे आणि परवाना रद्द करण्याऐवजी सुधारणा नोटीस (इम्प्रूव्हमेंट नोटीस) बजावण्याचे निर्देश दिले. (Mantralaya Canteen)



नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्रुटी आढळल्याने एफडीएने त्याचा परवाना रद्द केला होता. या कारवाईविरोधात हॉटेल प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान एफडीएने मंत्रालयातील कँटीन ७ तास तपासल्यानंतर ते ९८ टक्के स्वच्छ असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यावर आक्षेप घेत न्यायालयाने वकिलांच्या पथकाला फेरतपासणीचे आदेश दिले. अवघ्या अर्ध्या तासाच्या फेरतपासणीत कँटीनमध्ये माशा, उघड्या ड्रेनेज जाळ्या, अस्वच्छ बेसिन आणि कमालीचा घाणेरडा फ्रीज आढळल्याने एफडीएच्या अहवालातील फोलपणा न्यायालयात उघडा पडला. ( Canteen Hygiene)



...तर मुंबईतील निम्मी आस्थापने बंद पडतील


- कोर्टरुममध्ये कँटीनच्या दुरवस्थेचे फोटो दाखवत न्यायालयाने एफडीएच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असे सांगत न्यायालयाने स्पष्ट केले की, त्रुटी आढळल्यास सुधारण्याची संधी न देता परवाने रद्द केले, तर मुंबईतील अर्धी आस्थापने बंद पडतील. त्यामुळे एकतर मंत्रालयाच्या उपाहारगृहाचा परवाना रद्द करा किंवा याचिकाकर्त्या हॉटेलचा परवाना पूर्ववत करून त्यांना सुधारणा नोटीस द्या, असे निर्देश खंडपीठाने दिले. ( Mantralaya Canteen)
- न्यायालयाच्या या पवित्र्यानंतर एफडीएने संबंधित पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द करण्याची कारवाई मागे घेत त्यांना सुधारणा नोटीस देण्याचे मान्य केले. तसेच न्यायालयाने कँटीन तपासणीबाबत खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारवाईचा इशारा देत मंत्रालयातील उपाहारगृहालाही तात्काळ सुधारणा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर

Tehsildar Promotion : ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, तर २५ नायब तहसीलदार तहसीलदारपदी पदोन्नत

मुंबई : महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Cow Breed & Sheep Breed : महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान; उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर 'माडग्याळ' प्रजातीच्या

AI smart goggles : 'एआय स्मार्ट गॉगल्स'च्या वापराबाबत येणार निर्बंध; राज्य सरकारचे'एसओपी' तयार करण्याचे निर्देश

सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने