सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'मातृभूमी' (Matrubhoomi) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही कारणास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सलमान खान चे फॅन्स आणि प्रेक्षकवर्ग 'मातृभूमी' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, 'मातृभूमी' या सिनेमाचं नवीन गाणं नुकतेच रिलीज झाले आहे. ईदच्या खास प्रसंगी 'मातृभूमी' या चित्रपटाच 'मैं हूं' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. गुरुवारी सकाळी सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या आगामी चित्रपटाच्या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दक्षिण लेबनॉनमधील ( southern Lebanon) परिस्थिती चिघळली असून इस्रायली हवाई दलाने (IAF) हिजबुल्लाहच्या तळांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि विध्वंसक हल्ला केला आहे. ...
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह दिसत आहे. हे गाणे पार्टी साँग किंवा रोमँटिक नसून, एक अत्यंत दु:खद आणि भावनिक गाणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गाण्यात काही बदल केले जात आहे. सलमान खानने या सिनेमातील गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. गाण्याचा टीझर शेअर करत त्यानं लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.
सलमान खानने व्हिडीओ पाठवत कॅप्शनमध्ये,'O o o o om o o o oomm O o ommm O omm Main hooon' असं लिहिलं आहे. हा गाण्याचा व्हिडीओ समोर येताच सलमान खानच्या चाहत्याना प्रचंड आनंद झाला आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडूनही पसंती मिळत आहे. अनेक लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये 'ईद'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकानं कमेंटमध्ये, 'ईद मुबारक, मी तुमच्याच पोस्टची वाट पाहत होतो', असं म्हटलं आहे.
सिंधूचा जपानी खेळाडूवर एकहाती विजय; लक्ष्य सेनला वॉकओव्हर सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. भारतीय ...
हे नवीन गाणं सलमान खान आणि चित्रांगदा या दोघांवर केंद्रीत आहे. या गाण्यात प्रेम आणि जोडीदारापासून दूर राहण्याची तळमळ देखील दिसून येते. या दोन्ही भावना या गाण्यातून स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडीओ पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट आहे. 'मैं हूं' या गाण्याच्या ओरिजनल वर्जनमध्ये एका सैनिकाच्या परिवाराचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या गाण्यात आनंदाचे क्षण आणि जोडीदारापासून दूर जाण्याचे दु:ख देखील दाखवण्यात आले आहे. हे गाणं श्रेया घोषाल आणि अयानलाल यांनी गायले असून, हे गाणं आपल्या शूर सैनिकांनी केलेल्या त्यागाचे प्रदर्शन करते.
मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्ली : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक ...






